राज्यभरातून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी सुरू असताना नागपूरमध्ये यावरून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. नागपूरच्या महाल भागात दोन गटांमध्ये हाणामारी होऊन जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. सध्या परिस्थिती आटोक्यात असली तरी तणापूर्ण शांतता आहे. या हिंसाचाराच्या घटनेत पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. या घटनेवर विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी आपली प्रतिक्रिया देत हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल म्हणाले की, नागपुरात अफवा पसरवणाऱ्या, हिंसाचार आणि जाळपोळ करणाऱ्या जिहाद्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच औरंगजेबाच्या कबरीच्या जागी आदरणीय धनाजी जाधव, संताजी घोरपडे, छत्रपती राजाराम महाराज यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
हे ही वाचा :
उत्तर प्रदेश: औरंगजेबाची कबर फोडणाऱ्याला ५ बिघा जमीन, ११ लाख रुपये देणार!
‘उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन मोदींपुढे लोटांगण घालून आले, नंतर पलटी मारली!’
मार्चच्या अखेरीस ओडिशात होणार राष्ट्रीय खोखो स्पर्धा
अमेरिकेच्या DOGE प्रमाणेच मोदींच्या मॉडेलमुळे भारताचे वाचले पाच लाख कोटी
विहिंपचे केंद्रीय संघटन सरचिटणीस मिलिंद परांडे यांनीही नागपूरमधील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. मुस्लिम समाजाच्या एका वर्गाने केलेल्या जाळपोळ आणि हल्ल्याच्या घटना पूर्णपणे निषेधार्ह असल्याचे ते म्हणाले. युवा विंग बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले झाले, हिंदू समाजाच्या अनेक घरांना लक्ष्य करण्यात आले, महिलांनाही सोडले नाही याचा विश्व हिंदू परिषदेने निषेध केला आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराज नगरातील औरंगजेबाच्या समाधीचे गौरव करणे बंद करावे आणि त्यात सुधारणा करण्याचा विचारही करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. औरंगेजबाची कबर हटवून त्याठिकाणी मराठा पराक्रमी सरदार धनाजी जाधव, संताजी घोरपडे यांच्यासह छत्रपती राजाराम महाराजांचे विजयी स्मारक उभारण्यात यावा. विजयस्तंभ उभारण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
प्रेस वक्तव्य:
नागपुर में अफवाह फैलाने व हिंसा करने वाले जिहादियों के विरुद्ध हो कठोर कार्यवाही तथा औरंगजेब की कब्र के स्थान पर बने पूज्य धना जी, संता जी, छत्रपति राजाराम महाराज जी का स्मारकनई दिल्ली। मार्च 18, 2025। विश्व हिंदू परिषद ने मांग की है कि नागपुर में अफवाह फैलाकर,…
— Vishva Hindu Parishad -VHP (@VHPDigital) March 18, 2025