का आहे म्हशीची किंमत ८० लाख? वाचा सविस्तर…

का आहे म्हशीची किंमत ८० लाख? वाचा सविस्तर…

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील तासगाव गावात एका नवीन सेलिब्रिटीची चर्चा सुरु आहे. मात्र, ही सेलिब्रिटी म्हणजे एखादी व्यक्ती नसून चक्क एक म्हैस आहे. तासगाव येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत एक प्रदर्शन आयोजित केले आहे. आयोजित केलेल्या प्रदर्शनाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असलेल्या मंगसुली गावातून म्हशी आणण्यात आल्या आहेत. त्यातील विलास नाईक या शेतकऱ्याच्या म्हैशीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गजेंद्र असे या म्हशीचे नाव आहे.

गजेंद्र ही तब्बल दीड टन वजनाची असून सुमारे ८० लाख रुपये या म्हशीची किंमत आहे. या म्हशीची पूर्ण वाढ झालेली असून, तिचा भव्य आकार चांगल्या जनुकांना सूचित करतो ज्यामुळे तिला निरोगी संतती होईल. त्यामुळे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना चार वर्षांच्या गजेंद्रसारख्या म्हशींपासून लाखो रुपयांचे चांगले उत्पन्न मिळू शकते. याच कारणास्तव तिला खूप महत्त्व दिले जात आहे. ही गजेंद्र दिवसातून चार वेळा गवत आणि ऊस खाते. दिवसाला १५ लिटर दूध देते.

हे ही वाचा:

तेलंगणामध्ये समलैंगिक पुरुष अडकले लग्नबंधनात!

तुकाराम सुपेंच्या घरातून २ कोटी जप्त

हेमा मालिनी म्हणतात, अयोध्या, काशीनंतर मथुरा

तेलंगणामध्ये समलैंगिक पुरुष अडकले लग्नबंधनात!

महाराष्ट्रस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख महेश खराडे म्हणाले, “ही म्हैस आमची शेतीची शान बनली आहे. तिच्या संगोपनासाठी लाखो रुपये खर्च येतो कारण ती चांगल्या दर्जाच्या म्हशींचे पुनरुत्पादन करेल. गजेंद्रला पाहून आमच्या गावातील इतर शेतकरी निरोगी जनावरांचे संगोपन करण्याच्या पद्धती लागू करू लागले आहेत जेणेकरून त्यांना चांगल्या उत्पन्नाचा नवीन स्रोत मिळेल. तसेच, आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अशा प्रकारचे पशुसंवर्धन करणे आवश्यक आहे.”

Exit mobile version