22 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषमुंबईकरांना पुन्हा धक्का ..दुधाच्या दरात झाली इतकी वाढ

मुंबईकरांना पुन्हा धक्का ..दुधाच्या दरात झाली इतकी वाढ

दरवाढ ३१ ऑगस्टपर्यंत लागू राहणार

Google News Follow

Related

मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत गायीच्या दुधाच्या विक्री दरात वाढ झाली होती. आता मुंबई दूध उत्पादक संघाने शहरातील म्हशीच्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत सध्या म्हशीचे दूध ८० रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. १ मार्चपासून मुंबईकरांना म्हशीचे दूध घेण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ ३१ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे. गुरुवारी रात्री उशिरा एमएमपीएच्या सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.

दुभती जनावरे आणि त्यांच्या चाऱ्याच्या किमतीमध्ये १५-२५ % वाढली आहे आणि गवत आणि पेंढा देखील महाग झाला आहे, त्यामुळे किंमत दुधाच्या किमती वाढविण्यात येत असल्याचे मुंबई दूध उत्पादक संघाचे प्रवक्ते सी. के सिंग यांनी सांगितले. मुंबईतील ३,००० पेक्षा जास्त किरकोळ विक्रेत्यांद्वारे विक्री होणाऱ्या म्हशीच्या दुधाची किंमत प्रति लिटर ८० रुपये वरून ८५ रुपये प्रति लिटर केली जाईल आणि ती ३१ ऑगस्टपर्यंत लागू असेल.

सप्टेंबर २०२२ नंतरची ही दुसरी मोठी दरवाढ आहे. यापूर्वी म्हशीच्या दुधाची किंमत ७५ रुपये प्रतिलिटरवरून ८० रुपये प्रति लिटर अशी वाढवण्यात आली होती. या दरवाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे घरगुती बजेटआणखी बिघडणार आहे. मुंबईत दररोज ५० लाख लिटरहून अधिक म्हशीचे दूध वापरले जाते. मात्र, यावेळी केवळ दुधाच्याच नव्हे तर दुधापासून बनवलेल्या पदार्थांच्या किमतीतही मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. दही, तूप, पनीर आदी दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे भाव अचानक इतके वाढले आहेत की, या अचानक वाढलेल्या महागाईवर कशी मात करायची, हेच लोकांना समजत नाही.

याच महिन्यात अमूलने दुधाच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ केली होती. या दरवाढीनंतर अमूल गोल्ड दुधाचा दर प्रतिलिटर ६६ रुपये, अमूल गायीचे दूध ५६ रुपये प्रतिलिटर, अमूल ताझा ५४ रुपये प्रति लिटर आणि अमूल ए२ म्हशीचे दूध ७० रुपये प्रतिलिटर झाले आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये मदर डेअरीनेही दुधाच्या दरात वाढ केली होती. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली होती.

हे ही वाचा:

मुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल

आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा

‘जमाई’ करायला गेला कमाई आणि आला पोलिसांच्या जाळ्यात

कोविडनंतर बेरोजगारीचे प्रमाण घसरणीला.. आले इतक्या टक्क्यांवर

म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात वाढ करण्याच्या मुंबई दूध उत्पादक संघाने नुकत्याच केलेल्या घोषणेचा परिणाम संपूर्ण पुरवठा साखळीवर होण्याची शक्यता आहे. पुरवठादारांना जास्त किंमतींचा फायदा होऊ शकतो, परंतु येत्या काही महिन्यांत ग्राहकांना त्यांच्या दुधासाठी अधिक पैसे द्यावे लागतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा