24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषराम मंदिराचे स्वप्न साकार,तिहेरी तलाक,गरिबांना कायम स्वरूपी घरे; राष्ट्रपती मुर्मू यांचे अभिभाषण!

राम मंदिराचे स्वप्न साकार,तिहेरी तलाक,गरिबांना कायम स्वरूपी घरे; राष्ट्रपती मुर्मू यांचे अभिभाषण!

नव्या संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पहिलेच भाषण

Google News Follow

Related

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून म्हणजेच बुधवारपासून (३१ जानेवारी) सुरू झाले असून हे ९ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.तसेच मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली.

नवीन संसद भवनातील पहिलेच भाषण
नवीन संसदेतील आपल्या पहिल्या अभिभाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, नवीन संसद भवनातील हे माझे पहिले भाषण असल्याचे त्यांनी सांगितले.भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे आणि गेल्या सलग दोन तिमाहीत देशाचा विकास दर ७.५ टक्के राहिला आहे, राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.भारतीय संविधान लागू होऊन ७५ वर्ष झाल्याचे त्यांनी सांगितले.चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला.मागच्या वर्षभरात भारताने अनेक टप्पे गाठल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले.

राम मंदिराचे अनेक वर्ष पाहिलेलं स्वप्न साकार झाले
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणाची सुरुवात राम मंदिर निर्माणाने केली. राम मंदिर निर्माण झाल्याने अनेक वर्ष पाहिलेलं स्वप्न साकार झाले आहे,असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.राष्ट्रपतींच्या मुखाने राम मंदिराचा उल्लेख होताच संसदेतील सर्व सदस्यांनी प्रतिसाद देत प्रभू रामाच्या घोषणा दिल्या.राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या की, आमच्या सरकारने नारी शक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून महिलांना लोकसभेत आरक्षण दिले.तिहेरी तलाक विरोधातील कायद्या, नारी शक्ती वंदन कायद्या तसेच जम्मू-काश्मीर अनुच्छेद ३७० हटवणे अशा कामांचा उल्लेख राष्ट्रपती यांच्याकडून करण्यात आला.तसेच आमच्या सरकारने लाखो युवकांना नोकऱ्या दिल्या.

हे ही वाचा:

हर्ष गायकरच्या खेळाने दिलीप वेंगसरकर प्रभावित!

प. बंगालमध्ये राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक

इम्रान खान यांना आणखी १४ वर्षांची शिक्षा, यावेळी पत्नीही शिक्षेस पात्र!

काँग्रेसचे मानवेंद्र सिंह चालवत असलेल्या गाडीला अपघात, पत्नीचा मृत्यू

१० कोटींहून अधिक लोकांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत.११ कोटी ग्रामस्थांना पाईपने पाणी पोहचले आहे.कोरोनाच्या काळात ८० कोटी देशवासियांना मोफत राशन देण्यात आले असून येत्या ५ वर्षासाठी या योजनेचा कालावधी वाढवण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या भाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी खासदारांनी बाकं वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.

जागतिक महामारीतही माझ्या सरकारने सर्वसामान्यांवर बोजा वाढू दिला नाही
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, ‘विकसित भारताची भव्य इमारत युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब या चार स्तंभांवर उभी राहील आणि या चार स्तंभांना बळकट करण्यासाठी सरकार सतत काम करत आहे. गेल्या काही वर्षांत जगाने दोन मोठी युद्धे पाहिली आहेत आणि कोरोनासारख्या जागतिक महामारीचा सामना केला आहे. एवढ्या जागतिक संकटानंतरही माझ्या सरकारने देशातील महागाई नियंत्रणात ठेवली आणि सर्वसामान्य भारतीयांवर बोजा वाढू दिला नाही.पूर्वी देशवासीयांच्या २ लाखाच्या उत्पन्नावर कर अआकाराला जात होता.मात्र. आता ७ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर आकाराला जात नाही.

योजना वेगाने पूर्ण करणे हे आमच्या सरकारचे उद्दिष्ट
राष्ट्रपती म्हणाले की, माझ्या सरकारने उज्ज्वला योजनेवर २.५ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. गरिबांना स्वस्त रेशन देण्यासाठी २० लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आयुष्मान योजनेंतर्गत मोफत उपचार केले जात आहेत. किडनीच्या रुग्णांना डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एलईडी बल्बच्या साह्याने वीजबिल वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.ह्या योजना वेगाने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आमच्या सरकारकडून ठेवण्यात आले आहे.तसेच गरीब आणि मध्यमवर्गीयांना स्वस्तात विमान तिकीट मिळत आहे.

पूर्वी देशात महागाईचा दर दोन आकडी आता एक आकडी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, ‘आज जगातील एकूण रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांपैकी ४६ टक्के व्यवहार भारतात होतात. गेल्या महिन्यात यूपीआयद्वारे
१२०० कोटी व्यवहार झाले आहेत, जो एक विक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत १८ लाख कोटी रुपयांचा देखील व्यवहार झाला आहे.पूर्वी देशात महागाईचा दर दुहेरी अंकात असायचा, तो आता चार टक्के आहे.

मागास घटकांसाठी पीएम जनमन योजना
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, नागरिकांची प्रतिष्ठा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असल्याचे त्यानी सांगितले.आमच्या सरकारने सर्वात मागास जातींवर लक्ष केंद्रीत केले. यांच्यासाठी २४ हजार कोटींची पीएम जनमन योजना तयार केली. दिव्यांगजनासाठी सुगम्य भारत अभियान चालविले. भारताच्या प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यासक्रम आणण्याचा प्रयत्न केला. तृतीयपंथीयांना सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी कायदा मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ८४ लाखांहून अधिक लोक पीएम विश्वकर्मा योजनेत सहभागी झाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा