केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान, त्यांनी गेल्या १० वर्षातील सरकारच्या कामगिरीची गणना केली आणि विकसित भारतासाठी सरकारचा रोडमॅप देखील सांगितला.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाषणात सरकारच्या अनेक योजनांचा उल्लेख केला.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, गेल्या १० वर्षात अर्थव्यवस्थेत खूप विकास झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही प्रगती झाली आहे.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा अनेक आव्हाने होती.परंतु, सबका साथ, सबका विकास या मंत्राने सर्व आव्हानांचा सरकारने सामना केला, असे सीतारामन म्हणाल्या.
मोठ्या योजना प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण केल्या जात आहेत
निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, लोक चांगले जीवन जगत आहेत आणि चांगले उत्पन्न मिळवत आहेत. मोठे प्रकल्प प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण होत आहेत. जीएसटीमुळे एक देश, एक बाजार आणि एक कर ही संकल्पना बळकट झाली आहे. गिफ्टी IFSC ने जागतिक आर्थिक गुंतवणुकीचा मार्ग खुला केला आहे, असे सीतारामन म्हणाल्या.
हे ही वाचा:
“गरीब, महिला, युवा, अन्नदाता यांच्यावर लक्ष केंद्रीत”
जनहितासाठी काम केले, रोजगाराच्या संधी वाढल्या, लोकांचे उत्पन्न वाढले!
“सर्वांचा पाठिंबा, विश्वास, प्रयत्न या मंत्रानेचं पुढे जातोय”
इम्तियाज जलील यांच्यासह ५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल
रेल्वे ऊर्जा, खनिजे आणि सिमेंटसाठी तीन रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील. त्यांची ओळख ‘पीएम गति शक्ती’ अंतर्गत करण्यात आली आहे. यामुळे खर्च कमी होईल आणि मालाची वाहतूक सुलभ होईल. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे विकास दर वाढण्यास मदत होईल. वंदे भारतच्या मानकांनुसार ४० हजार सर्वसाधारण बोगी विकसित केल्या जातील जेणेकरून प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा वाढू शकतील.
पंतप्रधान मोदींचा जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधानचा नारा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, व्यवसायांच्या वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान लाभदायक ठरत आहेत.लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसानचा नारा दिला होता. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी जय जवान, जय किसान, जय विज्ञानाचा नारा दिला होता. याबाबत अधिक माहिती देताना पंतप्रधान मोदींनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधानचा नारा दिला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात रस असणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ असल्याचे त्यांनी सांगितले. एक लाख कोटी रुपयांचा निधी बिनव्याजी किंवा कमी व्याजदराने वितरित केला जाणार असल्याचे म्हणाले. यामुळे दीर्घकालीन आर्थिक मदत मिळेल व खाजगी क्षेत्राला याची मदत होईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.