बजेट २०२४; देशवासीयांच्या आशा, आकांक्षा आणि विश्वास पूर्ण करण्याच्या संकल्पाचे प्रतिबिंब !

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं ट्विट

बजेट २०२४; देशवासीयांच्या आशा, आकांक्षा आणि विश्वास पूर्ण करण्याच्या संकल्पाचे प्रतिबिंब !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी प्रमुख नऊ मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. देशातील नऊ क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी देखील अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींबद्दल आनंद व्यक्त करत हा अर्थसंकल्प देशाला समृद्धीकडे घेऊन जाणार असल्याचे म्हटले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा अर्थसंकल्पाचे कौतुक केले.

मंत्री अमित शाह यांनी ट्विट करत लिहिले की, २०२४-२५ चा अर्थसंकल्प हा मोदीजींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या देशवासीयांच्या आशा, आकांक्षा आणि विश्वास पूर्ण करण्याच्या संकल्पाचे प्रतिबिंब आहे. हा अर्थसंकल्प तरुण आणि महिलांचे सक्षमीकरण करून तसेच शेतकऱ्यांना अनेक संधी उपलब्ध करून देऊन विकसित आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशाच्या भावी पिढीच्या आत्मविश्वासाला अधिक बळकटी दिल्याने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, असे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी म्हटले.

हे ही वाचा:

५ वर्षात टॉप ५०० कंपन्यांमध्ये १ कोटी तरुणांना मिळणार इंटर्नशिप !

स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजार रुपयांवरून ७५ हजार, ३ लाख उत्पन्नापर्यंत कर नाही

भारताला समृद्ध करणारे ‘बजेट’

‘मोदी 3.0 सरकार’च्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी १.५२ कोटी

Exit mobile version