बदायूत मंगळवारी (१९मार्च) सायंकाळी दोन मुलांची हत्या केल्यानंतर आरोपी साजिदला पोलिसांनी रात्री उशिरा चकमकीत ठार केले. साजिदने बाबा कॉलनीत राहणारे कंत्राटदार विनोद ठाकूर यांची दोन मुले आयुष (१३) आणि आहान (६) यांची निर्घृण हत्या केली होती. त्यांचा तिसरा मुलगा पियुष यालाही चाकूने वार करून जखमी केले. रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर साजिदला घेरले आणि चकमकीत ठार केले. दरम्यान, आरोपीचा भाऊ जावेद हा देखील घटनेच्या वेळी उपस्थित होता.मात्र, अद्याप तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या आरोपीच्या आईने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.आरोपी साजिदची आई नाझिमा म्हणाल्या की, चकमकीत ठार झालेल्या माझ्या मुलाच्या मृत्यूने आम्हाला दुःख झालेले नाही.चुकीचे काम केल्यामुळे ही त्यांना शिक्षा झाली.मात्र, निष्पाप मुलांच्या हत्येने आम्हाला दु:ख झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी साजिदच्या काका आणि वडिलांना ताब्यात घेतले आहे. दुहेरी हत्याकांडात नाव असलेला दुसरा आरोपी जावेदचा अद्याप शोध लागलेला नाही. एसओजीसह पोलिसांची तीन पथके त्याचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा:
तुम्ही उतरलात तरी घडायचे तेच घडणार !
पोल बाँड्सने राजकारणातील काळा पैसा संपवला
पंतप्रधान मोदींचा केरळ दौरा, लोकांच्या प्रचंड गर्दीने विरोधकांमध्ये भरली धडकी!
बुमराह सराव शिबीराला अजूनही अनुपस्थित, मुंबई इंडियन्समध्ये काय चाललंय?
दरम्यान, मुख्य आरोपी साजिद हा पोलिसांच्या चकमकीत ठार झाला असून त्याचा भाऊ जावेद अद्याप फरार आहे.हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलिसांचा तपास सुरु आहे.