कोरोना चाचण्यांच्या आकडेवारीचा फुगा फुटला

कोरोना चाचण्यांच्या आकडेवारीचा फुगा फुटला

मुख्यमंत्र्यांच्या अहंकाराचा परिणाम असल्याची भातखळकरांची टीका

गेले काही दिवस सातत्याने महाराष्ट्रामधील कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला असल्याचे सांगितले जात आहे. रुग्णवाढीची कमी झालेली टक्केवारीही कमी केलेल्या चाचण्यांचा परिणाम असल्याचा आरोप भाजपाकडून सातत्याने करण्यात आला होता. आता वृत्तपत्रांमधील वृत्तांत मुळेच हा फुगा फुटल्याचे समोर आले आहे. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

महाराष्ट्रामधील ३६ पैकी ५०% जिल्ह्यांमध्ये आवश्यक त्या चाचण्या होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संसर्ग वाढीचा वेग अधिक असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढीचे टक्केवारी ही कमी राहिली होती. राज्यातील सरासरी सुमारे बावीस टक्क्यांच्या आसपास अकरा मेपासून राहिली होती मात्र अहमदनगर बीड बुलढाणा परभणी सातारा सिंधुदुर्ग आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये दुखणं वाढीची टक्केवारी ३० टक्क्यांच्या आसपास होती. याच्या उलट सांगली जालना हिंगोली सह इतर दहा जिल्ह्यांमध्ये ही टक्केवारी २३ ते २७ टक्‍क्‍यांच्या आसपास होती.

हे ही वाचा:

मुंबईत आज-उद्या लसीकरण बंद ठेवून काय वीकेंड साजरा करायचा आहे का?

ठाकरे सरकारचे मंत्री फक्त बोलतात, आणि भरडली जाते जनता

आता तरी कोकणवासींना पुन्हा निसर्गाच्या हवाली सोडू नका

सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांचा माफीनामा

चाचण्या कमी केल्याने संसर्ग झालेल्यांची ओळख पटत नाही. त्यामुळे संसर्ग पसरण्याचा वेग वाढलेला राहतो. भाजपा यावरून सरकारवर सातत्याने टीका करत आला आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील यावरून ट्वीटरच्या माध्यमातून टीका केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अहंकाराचाच हा परिणाम असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version