बसपा नेते हरबिलास सिंह रज्जूमाजरा यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंबाला पोलीस आणि एसटीएफने आरोपी सागरला चकमकीत ठार केले आहे. या गोळीबारात दोन ते तीन पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंबाला पोलीस आणि हरियाणा एसटीएफला बसपा नेता हत्या प्रकरणातील मुख्य शूटर सागरची गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलीस पथकाने संयुक्त कारवाई केली. कारवाई दरम्यान आरोपीने पोलिसांना पाहताच त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर हरियाणा एसटीएफ आणि अंबाला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. क्रॉस फायरिंगमध्ये आरोपीचा मृत्यू झाला.
या चकमकीत तीन पोलीस जखमी झाले. जखमी झालेल्या पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चकमकीत ठार झालेला शूटर सागर याचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी अंबाला कँटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
हे ही वाचा :
बसपा नेते हरबिलास सिंह रज्जुमाजरा कोण होते?
हरियाणा विधानसभा निवडणुकीत २०२४ मध्ये, हरबिलास रज्जुमाजरा यांनी नारायणगढ मतदारसंघातून बसपा-INLD चे संयुक्त उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांना २८ हजारांहून अधिक मते मिळाली होती. सध्या ते हरियाणामध्ये बहुजन समाज पक्षाचे राज्य सचिव म्हणून नियुक्त होते. २४ जानेवारी रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.