पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी हाणून पाडली

पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) यश

पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी हाणून  पाडली

भारत-पाकिस्तान सीमेवर अमृतसरमधील अजनाळा येथे पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) यश आले आहे. या ड्रोनमधून ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.बीएसएफचे डीआयजी प्रभाकर जोशी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बीएसएफने परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.

बीएसएफ बटालियन ७३ चे जवान पहाटे साडेचारच्या सुमारास अजनाळ्यातील शाहपूर गावाजवळ गस्त घालत होते. त्यावेळी जवानांना या ड्रोनचा आवाज ऐकू आला. त्यानंतर फायरिंगच्या १७ राउंड केल्यानंतर जवानांना ड्रोन पाडण्यात यश आले.पंजाबमधील गुरुदासपूर भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफने पाकिस्तानी ड्रोन पाडले आहे. डीआयजी बीएसएफ घटनास्थळी पोहोचले असून परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध सुरू करण्यात आला आहे. ड्रोनचा आवाज ऐकून बीएसएफ जवानांनी गोळीबार केला. गोळी झाडल्यानंतर ड्रोन भारताच्या हद्दीत पडले. सध्या बीएसएफ जवानांनी ड्रोन ताब्यात घेतला आहे.

हे ड्रोन चीनी बनावटीचे क्वाडकॉप्टर डीजेआय मेट्रिक ३०० आहे. हे ड्रोन १० किलो वजन वाहून अनेक किलोमीटर प्रवास करू शकते.पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून घुसखोरी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात, पंजाब पोलिसांनी सीमेवर ड्रोनद्वारे शस्त्रास्त्र तस्करीचे मॉड्यूल उघड केले. पंजाब पोलिसांनी धोकादायक शस्त्रांच्या खेपासह चार जणांना अटक केली आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक (डीजीपी) यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पाकिस्तानातून १९१ वेळा ड्रोनद्वारे भारतीय हद्दीत बेकायदेशीरपणे घुसण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामुळे देशातील अंतर्गत सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे.

हे ही वाचा:

राणा आयुबचे ईडीने १ कोटी ७७ लाख रुपये गोठवले

आमिरवर जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या विरोधात बॅनर झळकले

काश्मीर मुद्द्यावर टिपण्णी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने फटकारले

केंद्र सरकारने अलीकडेच पाकिस्तानच्या बाजूने अशा बेकायदेशीर घुसखोरी नियंत्रणात आणण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमेवर प्राऊटडे सुरु केले आहेत. १९१ ड्रोनपैकी १७१ पंजाब भागात भारत-पाकिस्तान सीमेवरून भारतीय हद्दीत घुसले, तर २० जम्मू क्षेत्रात दिसले.

Exit mobile version