केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवार, १ डिसेंबर रोजी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) स्थापना दिनानिमित्त अभिवादन केले. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे सैनिक अटल निर्धाराने भारताचा सन्मान आणि आकांक्षा जपण्यासाठी एक भक्कम ढाल म्हणून उभे आहेत.
भारत- पाकिस्तानच्या ३,३२३ किमी आणि भारत- बांगलादेश सीमेच्या ४,०९६ किमीच्या संरक्षणासाठी जबाबदार असलेल्या सीमा रक्षक दलाला त्यांच्या जवानांचे धैर्य, निस्वार्थीपणाबद्दल या विशेष दिवशी अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या. अमित शाह म्हणाले की, बीएसएफ जवानांच्या अदम्य शौर्याने आणि बलिदानाने केवळ भारताच्या सीमाच मजबूत केल्या नाहीत तर देशभक्तांच्या पिढ्यानपिढ्यांना सुरक्षित राष्ट्राच्या आदर्शाचे पालन करण्यास प्रेरित केले. जवानांनी अत्यंत जिद्दीने भारताच्या सन्मानाचे आणि महत्वाकांक्षेचे रक्षण केले आहे. त्यासाठी आपले प्राण देताना कधीही त्यांनी दुसऱ्यांदा विचार केला नाही. त्यांचे शौर्य आणि बलिदान हे प्रेरणेचे अखंड झरे आहेत ज्याने देशभक्तांच्या पिढ्या उभ्या केल्या आहेत. कर्तव्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना माझी विनम्र श्रद्धांजली,” असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा..
भारतीय वंशाचे काश पटेल हे एफबीआयच्या संचालक पदी
कॅनडाचे खलिस्तानी प्रेम; दहशतवादी अर्श डल्लाला मिळाला जामीन
‘न्यूज २४’ कडून भारताचा जीडीपी कमी झाल्याचा खोटा दावा
केरळातील कम्युनिस्ट पार्टी सांप्रदायिक शक्तींच्या नियंत्रणाखाली म्हणत माजी उपाध्यक्ष भाजपात
बीएसएफ, ज्याला भारताची पहिली संरक्षण रेषा म्हणून संबोधले जाते. १ डिसेंबर १९६५ रोजी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आले. त्याच्या स्थापनेपूर्वी, सीमा सुरक्षा राज्य सशस्त्र पोलिस बटालियनद्वारे व्यवस्थापित केली जात होती. पाकिस्तान आणि नंतर बांगलादेशसह भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी, राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, बेकायदेशीर क्रियाकलापांना प्रतिबंध करण्यासाठी आणि बंडखोरीविरोधी कारवायांना समर्थन देण्यासाठी गृह मंत्रालयाच्या अंतर्गत बीएसएफची निर्मिती करण्यात आली होती. स्थापनेपासून, बीएसएफने भारताच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यात आणि सीमेवर शांतता राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.