बांगलादेशातील सत्तापालटानंतर बीएसएफकडून सर्व सीमेवर ‘हाय अलर्ट’

बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्था लष्कराच्या हाती

बांगलादेशातील सत्तापालटानंतर बीएसएफकडून सर्व सीमेवर ‘हाय अलर्ट’

बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्यावरून वाढता हिंसाचार पाहून हसीना शेख यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. हसीना शेख यांच्या राजीनाम्यानंतर बांग्लादेशच्या लष्कराने सत्ता हाती घेतली आहे. दरम्यान, बांगलादेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. बीएसएफचे डीजीही कोलकाता येथे पोहोचले असल्याची माहिती बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा ४,०९६ किलोमीटर लांब आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहता बीएसएफने सर्व सीमेवर अलर्ट जारी केला आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून बांगलादेश मागील एक महिन्याहून अस्थिर आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ३०० हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. संचार बंदी देखील लागू करण्यात आली आहे. हसीना शेख यांनी बांगलादेश सोडून भारतात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारत-बांगलादेश सीमेवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीएसएफकडून सर्व सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे ही वाचा..

शेख हसीना यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा, लष्कर घेणार ताबा!

गणपतीसाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद !

सेन्सेक्स २,५०० अंकांनी घसरला, निफ्टीतही घसरण

उत्तर प्रदेश बलात्कार प्रकरणात सामील असलेला राजू हा हिंदू नव्हे तर मुस्लिम…पोलिसांकडून स्पष्टीकरण

दरम्यान, बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्था आता लष्कराने आपल्या हाती घेतली आहे. लष्कराने पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. तसेच देशात लवकरच शांतात नांदेल असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version