26 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरविशेषसंतापजनक! तीन गायींची स्तने अर्धवट कापली, आरोपी सय्यद नसरूला अटक!

संतापजनक! तीन गायींची स्तने अर्धवट कापली, आरोपी सय्यद नसरूला अटक!

बेंगळूरू मधील घटना

Google News Follow

Related

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चामराजपेठ परिसरात तीन गायींची स्तने अर्धवट कापल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चामराजपेठ परिसरातून आरोपीला अटक केली. सय्यद नसरू (३०) असे आरोपीचे नाव असून तो बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील रहिवासी आहे.

कॉटनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनायक नगर हद्दीतून रविवारी (१२ जानेवारी) मध्यरात्री काही बदमाश्यांनी तीन गायींची स्तने अर्धवट कापल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी प्राणी क्रूरता कायदा आणि बीएनएस कलम ३२५ अंतर्गत एफआयआर नोंदवत तपास सुरु केला. या घटनेनंतर भाजपाने निषेध दर्शवत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तपासादरम्यान सय्यद नसरू नावाच्या व्यक्तीने दारूच्या नशेत ही घटना केल्याचे पोलिसांना समजले. यानंतर त्याला अटक करण्यात आली.

आरोपी सय्यद नसरू याने मद्यधुंद अवस्थेत गायीसोबत हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत अन्य कोणाचाही सहभाग नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आरोपी सय्यद नसरू याला पोलिसांनी अटक केली असून त्याला २४ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, जखमी गायींवर पशुवैद्यकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यानंतर त्यांची प्रकृती चांगली आहे.

हे ही वाचा : 

प. बंगाल मध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्याची हत्या

शिक्षण विभागाच्या योजना मिशन मोडवर राबवा

पानिपत मराठी माणसाची भळभळती जखम अन अभिमानही!

दिल्लीत केजरीवाल-काँग्रेस यांच्यात जुंपली

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा