गुप्तांगात लपवून आणले १ किलो वजनी सोने, तपासणी करताच पितळ उघड!

राजस्थानच्या जयपूर विमानतळावरील घटना

गुप्तांगात लपवून आणले १ किलो वजनी सोने, तपासणी करताच पितळ उघड!

राजस्थानमधील जयपूर विमानतळावर एका व्यक्तीला एक किलो सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले आहे. आरोपीने हे सोने अबुधाबीहून आणले होते. विमान उतरल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला थांबवत तपासणी केली असता त्याच्या शरीरात सोन्याच्या कॅप्सूल लपविल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने एक किलो सोने आपल्या गुप्तांगात लपवले होते.

मिडिया रिपोर्ट्सनुसार, महेंद्र खान असे आरोपीचे नाव आहे. आरोपी राजस्थानमधील बेवार जिल्ह्यातील सरगाव भागातील रहिवासी असून तो अबुधाबीहून इतिहाद एअरवेजच्या विमानाने जयपूरला पोहोचला होता. सोन्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

हे ही वाचा : 

या विधानसभा निवडणुकीत ‘फेक नरेटिव्ह’ चालणार नाहीत!

८ वर्षे तुरुंगवास भोगलेल्या माजी आमदाराच्या मुलीला राष्ट्रवादी शप गटाचे तिकीट!

सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबेल तेव्हाच बंगालमध्ये शांतता नांदेल!

‘पहिल्यांदाच डिजिटल अटकेचा उल्लेख, फसवणूक टाळण्यासाठी पंतप्रधानांनी सांगितले तीन उपाय’

त्यानंतर विमानतळावर आरोपीला थांबवून एक्स-रे स्कॅनद्वारे तपासणी केली असता शरीरात कॅप्सूलच्या आकाराचे धातू असल्याचे दिसून आले. आरोपीची चौकशी केली असता स्थानिक पॅरामेडिकलच्या मदतीने हे सोने आपल्या गुप्तांगात लपविल्याचे आरोपीने सांगितले. विमानतळावरील तपास टाळण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले.

त्यानंतर आरोपीला विमानतळाजवळील जयपूरिया रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ऑपरेशन करून आरोपीच्या गुदद्वारातून सोन्याचे तुकडे बाहेर काढले. बाहेर काढण्यात आलेल्या सोन्याच्या तुकड्यांचे वजन १ किलो असून याची किंमत सुमारे ९० लाख रुपये आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Exit mobile version