भारताच्या स्वातंत्र्यदिनाआधी हिजबुलचा दहशतवादी असलेला जावेद मट्टू याचा भाऊ रसई मट्टू हा त्याच्या जम्मू-काश्मीरमधीस सोपोर येथील घराच्या खिडकीमध्ये भारताचा राष्ट्रध्वज फडकवत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
जावेद मट्टू याला फैजल/साकिब/मुसैब या नावानेही ओळखले जाते. हा हिजबुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेशी संबंधित सक्रिय दहशतवादी आहे. सुरक्षा यंत्रणेच्या दहशतवाद्यांच्या यादीत पहिल्या १० दहशतवाद्यांमध्ये त्याची गणना होते. त्यामुळे त्याच्या भावाने तिरंगा फडकवल्याचे दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तत्पूर्वी रविवारी श्रीनगरमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विशाल तिरंगा रॅली काढली गेली. ज्यात जम्मू आणि काश्मीरच्या उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सिन्हा यांनी पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांना लक्ष्य केले. ‘तिरंगा उचलण्यासाठी कोणीही वाचणार नाही, असे वक्तव्य करणाऱ्यांनी ही गर्दी पाहायला हवी,’ असे प्रतिपादन सिन्हा यांनी यावेळी केले.
हे ही वाचा:
शिमल्यात भूस्खलन, शिव मंदिर कोसळून ९ जणांचा मृत्यू !
इराणमधील प्रमुख शिया धार्मिक स्थळावर गोळीबार
सहा वर्षांत पहिल्यांदाच वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध टी-२० मालिका जिंकली
“तुम्ही नातीगोती जपायची आणि कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का?”
जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आल्याचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितले. ‘जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय दहशतवाद्यांची संख्या फारशी नसली तरी सुरक्षा दल सतर्क आहे. सीमेपलीकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना भरकटवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र तरुणांना हे समजून चुकले आहे की, हा मार्ग विनाशाचा आहे,’ असे ते म्हणाले.
‘भारताच्या ताब्यातील काश्मीरच्या भागातून घुसखोरीचा प्रयत्नही केला जात आहे. मात्र त्यांना नियंत्रण रेषेवरच रोखले जात आहे. त्यांचे बहुतेक प्रयत्न मोडून काढले जात आहेत. या वर्षी अधिक चकमकी नियंत्रण रेषेवर झाल्या आहेत,’ अशी माहिती त्यांनी दिली.