दिल्लीतील नगर निगम निवडणूकीपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. एसीबीने आम आदमी पक्षाच्या आमदाराचा मेहुणा आणि पीएसह ३ जणांना ताब्यात घेतले आहे. पैसे घेऊन नगरसेवकाचे तिकीट मिळवून देण्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात ९० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ५५ लाखांचा पहिला हप्ता त्यांनी घेतलाही होता. तर उऱलेले ३५ लाख रुपये काम झाल्यानंतर त्यांना मिळणार होते. त्याआधीच लाचलुचपत शाखेने त्यांच्या मुसक्या आवळल्या. अटकेनंतर अन्य कोणाची अशी फसवणूक करून पैसे तर घेतले नाहीत ना, याचा शोध पोलिस घेत आहेत.
हेही वाचा :
धर्मांतरणाचा तगादा लावणाऱ्या तरुणाने फेकले तरुणीला चौथ्या मजल्यावर खाली
आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी-शी जिनपिंग एकमेकांना भेटले, झाला संवाद
आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी-शी जिनपिंग एकमेकांना भेटले, झाला संवाद
हे प्रकरण आम आदमी पक्षाच्या एका महिला कार्यकर्त्याशी संबंधित आहे. या महिलेकडून नगरसेवकाचे तिकीट मिळवून देण्याच्या नावाखाली ९० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे एसीबीचे म्हणणे आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मॉडेल टाऊनमधील आपचे आमदार अखिलेशपती त्रिपाठी यांचा मेहुणा ओम सिंग, पीए विशाल पांडे आणि दुसरा आरोपी प्रिंस रघुवंशी यांचा समावेश आहे.
हे प्रकरण कमला नगरमधील वॉर्ड क्रमांक ६९ चे आहे. येथे आप कार्यकर्त्या शोभा खारी यांनी आम आदमी पक्षाकडून नगरसेवकपदाच्या तिकीटाची मागणी केली होती. तिकीट मिळवून देण्याच्या बदल्यात आमदार अखिलेश पती त्रिपाठी यांनी ९० लाख रुपयांची मागणी केली, असा आरोप शोभा यांनी केला आहे. अखिलेशपती त्रिपाठी यांना ३५ लाख रुपये आणि वजीरपूरचे आमदार राजेश गुप्ता यांना २० लाख रुपये लाच म्हणून दिल्याचे फिर्यादीत शोभा खारी यांनी म्हटले आहे.