पुणे- कोल्हापूर प्रवास फक्त अडीच तासात…

पुणे- कोल्हापूर प्रवास फक्त अडीच तासात…

पुणे ते कोल्हापूर हा प्रवास अवघ्या अडीच तासात करणे शक्य होणार आहे.

पुणे शहरापासून कोल्हापूर, पंढरपूर आदी २५० किलोमीटरपर्यंतच्या तसेच आळंदीसारख्या ठिकाणांसाठी ब्रॉडगेज मेट्रोचे जाळे तयार करणे शक्य असून त्यासाठी लोक प्रतिनिधींची इच्छा हवी, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.  या मेट्रोचा खर्च प्रति किलोमीटर अडीच कोटी रुपये आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यास पुणे ते कोल्हापूर प्रवास अवघ्या अडीच तासात होईल, असेही गडकरींनी सांगितले.

इंधन आयातीचे परावलंबित्व कमी करायचे असल्यास सार्वजनिक वाहतूक अत्यंत महत्वाची आहे. सध्या नागपूरमध्ये दहा मार्गांसाठी ब्रॉडगेज मेट्रो करणार असून पुण्यापासून कोल्हापूर किंवा पंढरपूर अथवा आळंदीपर्यंतही ब्रॉडगेज मेट्रो शक्य आहे. नेहमीच्या मेट्रो प्रकल्पासाठी प्रती किलोमीटर ३५० कोटी खर्च येतो. मात्र ब्रॉडगेज मेट्रोसाठी प्रती किलोमीटर खर्च हा अडीच कोटी येतो. पुणे ते कोल्हापूरसाठी सहा किंवा आठ डब्यांची मेट्रो चालवली जाऊ शकते. त्यातील दोन डबे बिझनेस तर, चार डबे ‘इकोनॉमी’ वर्गासाठी असतील. यातील सुविधा विमानाप्रमानेच असतील. त्याचे भाडेही एसटी किंवा बसच्या तिकीटाएवढे असेल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

सिंहराज अधानाने मिळवले कांस्य पदक

तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष?

‘केरळ मॉडेल’ तोंडावर आपटले

मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले, पुन्हा जागोजागी तुंबई

नागपूरमध्ये दहा मार्गांसाठी ब्रॉडगेज प्रकल्प होणार असून त्यासाठीचे सर्व परवाने मिळाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या धर्तीवर कोणत्या शहराला असा प्रकल्प करायचा असल्यास त्यासाठी सहकार्य करण्याची तयारी नितीन गडकरींनी दाखवली आहे. पुणे- कोल्हापूरमधील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास वाहतूक मंत्री म्हणून संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे, असे गडकरींनी सांगितले.

तेलबिया क्षेत्रातील देशाचा ‘रोडमॅप’, इथेनॉलचा इंधनातील वाढता वापर आणि त्याचे पंप, महाराष्ट्राशी संबंधित पालखी मार्गासह मेट्रो प्रकल्प आदी विषयांवर गडकरी बोलले. पुणे शहराच्या वाढीला आता मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे आता नवे पुणे तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मुंबई- नगर दरम्यान कल्याण माळशेज घाटाच्या पलीकडे २५ लाख लोकांसाठी नवे पुणे उभारणे शक्य आहे, असेही ते म्हणाले.

Exit mobile version