जोझिला पास (रस्ता) पुन्हा वाहतुकीसाठी खुला! BRO ची ऐतिहासिक कामगिरी

जोझिला पास (रस्ता) पुन्हा वाहतुकीसाठी खुला! BRO ची ऐतिहासिक कामगिरी

जम्मू, काश्मीर, लडाख या भागातील रस्ते बर्फवृष्टीमुळे बंद होणे काही नवी बाब नाही. दरवर्षी होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे महिनों महिने या भागातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद असतात. अशाच प्रकारे बर्फवृष्टीमुळे जोझिला पास हा श्रीनगर-कारगिल-लेह मार्गावरील रस्ता बंद पडला होता पण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अर्थात बीआरओ (BRO) मार्फ़त हा रस्ता साफ करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

बीआरओ म्हणजेच, सीमा रस्ते संघटनेने अत्यंत अद्भुत कामगिरी करत, लडाख आणि जम्मू कश्मीर या दोन केंद्रशासित प्रदेशांना जोडणाऱ्या श्रीनगर-कारगिल-लेह या ११,६५० फुट उंच असलेल्या मार्गावरील जोझिला खिंडीतला मार्ग, काल म्हणजेच शनिवार १९ मार्च २०२२ पासून वाहतुकीसाठी खुला केला आहे.

हे ही वाचा:

मिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला, आता अनिल परबचे रिसॉर्ट तुटणार

कलम ३७० पुन्हा लागू करा…शिवसेनेची मागणी

‘ज्या मलिकांनी शिवसेना भवनात स्फोट घडवला त्यांनाच शिवसेना वाचवतेय’

‘२४ महिन्यात ३६ इमारतींची खरेदी यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी केली’

हा मार्ग बंद झाल्यापासून केवळ ७३ दिवसांत तो पुन्हा सुरु करण्याचा ऐतिहासिक विक्रम बीआरओ ने केला आहे. याआधी ५ जानेवारी २०२२ पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होता, त्यानंतर बर्फवृष्टीमुळे तो बंद करण्यात आला होता. मात्र बीआरओ ने अत्यंत विपरित परिस्थितीत,रस्त्यावरील साचणारा बर्फ काढण्याचे काम अविरतपणे करत, केवळ ७३ दिवसांत हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला.

१५ फेब्रुवारी, २०२२ पासून जम्मू काश्मीरच्या प्रोजेक्ट बेकन आणि लडाखच्या विजयक अशा दोन्ही बाजूंनी खिंडीत साचलेला बर्फ काढण्याचे काम सुरु झाले. त्यामुळे, जोझिला खिंडीचा मार्ग दोन्ही बाजूंनी जोडण्याचे काम ४ मार्च पर्यंत पूर्ण झाले. त्यानंतर, वाहने इथून सुरक्षितरित्या जाऊ शकतील यासाठी रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. हे काम झाल्यावर, लडाखच्या लोकांसाठी आवश्यक मदत साहित्य घेऊन जाणारा पहिला ट्रक, जोझिला पासमार्गे कारगिलला पोहोचला. हिवाळ्यात होत असलेल्या अति बर्फवृष्टीमुळे हा मार्ग, साधारणत: १६० ते १८० दिवस बंद असतो. पण यावर्षी अवघ्या ७३ दिवसांतच हा मार्ग खुला झाला आहे.

Exit mobile version