पाईपलाईन खोदकामादरम्यान सापडले ‘ब्रिटीश कालीन बॉम्ब’

परिसरात उडाली खळबळ

पाईपलाईन खोदकामादरम्यान सापडले ‘ब्रिटीश कालीन बॉम्ब’

पिंपरी चिंचवडमध्ये ब्रिटीश कालीन बॉम्ब आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रेम लोक परिसरात पाईपलाईनचे खोडकाम सुरु असताना तीन ब्रिटीश कालीन बॉम्ब आढळून आले आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दल, अग्निशमन दल आणि बॉम्ब नाशक दल दाखल झाले. पथकाकडून संपूर्ण परिसराची पाहणी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दळवी नगर परिसरातील प्रेम लोक परिसरात आज (३० ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे पाणी पुरवठ्या करणाऱ्या पाईपचे काम सुरु होते. यावेळी खोदकामादरम्यान तीन ब्रिटीश कालीन बॉम्ब आढळून आले. पाईप लाईन दुरुस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पथक झाले आणि पाहणी सुरु केली.

हे ही वाचा : 

नवी मुंबईच्या सोसायटीत मुस्लिमांकडून दिवाळीसाठी रोषणाई करण्यास जोरदार विरोध

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिकांना तिकीट देऊन देशाचा विश्वासघात केलाय

मुंबई- नाशिक महामार्गावर गाडीत सापडले दोन कोटी रुपये

दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये आयुष्मान भारत लागू न केल्याने पंतप्रधान नाराज

पथकाने पाहणी करून सांगितले, हा जुना बॉम्ब आहे. अंदाजे २०-२५ वर्षांपूर्वीचा असून फुटण्याची शक्यात कमी आहे. योग्य ती खबरदारी घेतली असून परिसराची तपासणी सुरु आहे, असे पोलीस पथकाने सांगितले. दरम्यान, बॉम्ब आढळून आल्याचे समजताच परिसरात एकाच भीतीचे वातावरण पसरले आहे.

Exit mobile version