ब्रिटनच्या पंतप्रधानांनी कार चालवताना केली ही चूक, मागितली माफी

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी कार चालवताना केली ही चूक, मागितली माफी

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी पंतप्रधान म्हणून घेतलेल्या कोणत्याही मोठ्या निर्णयामुळे नाही तर त्यांनी माफी मागितली म्हणून. सोशल मीडियावर त्यांच्या माफीची चर्चा रंगली आहे.

कार चालवताना चालकाने आणि त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने सीटबेल्ट लावला पाहिचे असा नियम आहे. पण तो कधी पाळल्या जात नाही. उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर तर केक्सच्या आसनावर बसणाऱ्या व्यक्तींनाही सीटबेल्ट बंधनकारकी करण्यात आले आहे. पण त्याचे पालन फार क्वचितच केले जाते. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडून देखील अशीच काहीशी चूक झाली. त्यांच्या लक्षात येताच त्यांनी माफी देखील मागितली .

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवत होते. हा व्हिडीओ बनवताना त्यांनी इंग्लंडमध्ये गाडी चालवताना थोडावेळ सीटबेल्ट काढला होता. त्यांना आपली चूक लगेच लक्षात आली. वास्तविक त्यांनी अगदी थोडावेळच सीटबेल्ट काढला होता. पण सुनक यांनी लगेचच सीटबेल्ट काढण्याच्या चुकीबद्दल माफी मागितली.

हे ही वाचा:

भारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची

रोज होतात इतकी कोटी अंडी फस्त

महाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड

गूढ उकलले; बेपत्ता असलेल्या सदिच्छा सानेचा खून झाला!

ब्रिटनमध्ये, कारमध्ये सीटबेल्ट न घातल्याबद्दल जागच्या जागी दंड वसूल करण्याची तरतूद आहे. प्रकरण न्यायालयात गेल्यास दंडाची रक्कम वाढत जाते. वाढते. सुनक यांचा सीट बेल्ट न लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला तेव्हा त्यांनी लगेच चूक मान्य केली. पंतप्रधानांनी एक छोटी क्लिप काढण्यासाठी सीट बेल्ट काढला होता. ही चूक होती हे त्यांनी लगेच मान्य केले आणि त्याबद्दल मनापासून माफी मागितली असे पंतप्रधानांच्या प्रवक्त्याने सांगितले. वाहन चालवताना प्रत्येकाने सीट बेल्ट लावला पाहिजे असे पंतप्रधान सुनक यांचे मत आहे.

Exit mobile version