ब्रिटनच्या खासदारांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी ब्रिटिश खासदारांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे नाव ‘ नमस्ते लंडन: रिसर्जंस ऑफ अ न्यू इंडिया’ असे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अधिक प्रगती करत आहे, ही बाब कार्यक्रमादरम्यान ब्रिटिश खासदारांनी स्वीकारली.
कार्यक्रमात विविध पक्षांचे ब्रिटिश खासदार सहभागी झाले होते. या दरम्यान ‘इग्नायटिंग कलेक्टिव्ह गुडनेस : मन की बात@100’ चे प्रकाशन झाले. यात ऑक्टोबर २०१४मध्ये राष्ट्रासह पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या संवादाचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ‘हार्टफेल्ट’ नावाचे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. त्यात पंतप्रधान मोदी आणि शीख यांच्यातील दृढ नात्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ब्रिटनमधील भारताचे राजदूत विक्रम दोराईस्वामी हेदेखील यावेळी उपस्थित होते.
हे ही वाचा:
लाडली बहन योजना ठरली महिला सक्षमीकरणासाठी वरदान!
गडचिरोलीत सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार!
संसदेतील सुरक्षाभंगावरून विरोधी पक्षांचे राजकारण!
सटन आणि चीनचे खासदार पॉल स्टुअर्ट स्कली यांनी भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांच्या दरम्यान असणाऱ्या मजबूत संबंधांवर अभिमान व्यक्त केला. भारताला ऊर्जा देण्यासाठी आणि ब्रिटन- भारत संबंधांना मजबूत करण्यासाठी मोदी यांनी अवलंबलेल्या उपायांचे त्यांनी कौतुक केले.
नऊ वर्षांत केला विकास
‘जागतिक व्यासपीठावर भारताची स्थिती गेल्या नऊ वर्षांच्या तुलनेत आता खूपच मजबूत झाली आहे. सामाजिकसह भारत आता आर्थिकदृष्ट्याही मजबूत होत आहे,’ अशा शब्दांत हाऊस ऑफ ल़ॉर्ड्समधील खासदार लॉर्ड जर्मन यांनी मोदी यांचे कौतुक केले.