26 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरविशेषविष पेरणाऱ्या २४ मशिदींवर ब्रिटनची नजर, दोषी आढळल्यास मौलवीला १४ वर्षांची शिक्षा...

विष पेरणाऱ्या २४ मशिदींवर ब्रिटनची नजर, दोषी आढळल्यास मौलवीला १४ वर्षांची शिक्षा !

पाकिस्तानी वंशज चालवितात मशिदी

Google News Follow

Related

ब्रिटनमध्ये मोठ्या संख्येने पाकिस्तानी वंशाचे लोक राहतात आणि त्यांनी तिथे मशिदी बांधल्या आहेत. याच मशिदींवर ब्रिटन आता नजर ठेवून आहे. या मशिदींमधून ब्रिटनविरुद्ध द्वेष शिकवला जात असल्याची माहिती ब्रिटन सरकारला मिळाली आहे. त्यामुळे ब्रिटनमधील २४ मशिदींची चौकशी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यामध्ये मशिदीचा मौलवी दोषी आढळल्यास त्याला १४ वर्षांची शिक्षा होवू शकते.

ब्रिटनमधील २४ मशिदींवर द्वेषयुक्त भाषणाचा आरोप आहे. या मशिदी लंडन, बर्मिंगहॅम, लिव्हरपूल आणि मँचेस्टरसारख्या ब्रिटिश शहरांमध्ये आहेत. या मशिदींमधून गैरमुस्लिमांविरुद्ध फतवे काढण्यात आले होते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व मशिदी पाकिस्तानी वंशाचे लोक चालवतात.

गेल्या वर्षी गाझामध्ये युद्ध सुरू झाल्यापासून या मशिदींमधून द्वेष पसरवण्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. ब्रिटनमधील अनेक मशिदींच्या मौलानानी ज्यूंच्या विरोधात विष ओकले होते. इस्रायलचा नाश करणे, ज्यूंना मारणे, अल्लाहसाठी युद्ध पुकारणे असे हिंसक संदेश मौलानानी दिले होते. या प्रकरणी ब्रिटीश सरकारने चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून  तपासात जर मौलाना दोषी आढळल्यास त्याला १४ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

हे ही वाचा :

‘शिवलिंगावरील विंचू’ वक्तव्यामुळे पंतप्रधानांची बदनामी; थरूर यांना न्यायालयाने फटकारले

मुंबईतून सोने तस्करांना अटक, १७ कोटी किमतीचे २३ किलो सोने जप्त !

गोरेगावमध्ये हिट अँड रन; अल्पवयीन चालकाच्या गाडीच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

राजकोट किल्ला दुर्घटनेप्रकरणी चेतन पाटीलला कोल्हापुरातून अटक

ब्रिटनच्या २०२१ च्या जनगणनेनुसार, इंग्लंड आणि वेल्समध्ये ३८ लाख मुस्लिम आहेत, जे तेथील लोकसंख्येच्या सुमारे ६.५ टक्के आहे. हा आकडा २०११ च्या जनगणनेपेक्षा जास्त आहे. त्यावेळी २.७ दशलक्ष लोक मुस्लिम होते. तेव्हा ती लोकसंख्येच्या ४.९ टक्के होती. दुसऱ्या महायुद्धानंतर मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा