विवान कारुळकरच्या सनातन धर्मावरील पुस्तकावर ब्रिटन राजघराण्याची मोहोर

विवान कारुळकरने लिहिलेल्या पुस्तकाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक

विवान कारुळकरच्या सनातन धर्मावरील पुस्तकावर ब्रिटन राजघराण्याची मोहोर

‘द सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्स’ हे सनातन धर्म आणि विज्ञान यांच्या परस्परसंबंधांवरील तसेच विज्ञानाचे खरे मूळ हे सनातन धर्मातच आहे हे सांगणारे पुस्तक १६ वर्षांच्या विवान कारुळकरने लिहिले आहे. त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता या पुस्तकाची दखल थेट लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमधील रॉयल फॅमिलीकडून घेण्यात आली आहे. विवान याला त्याच्या कौतुकास्पद कामासाठी बॅज आणि नाणे देण्यात आले आहे.

प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर आणि प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांचे सुपुत्र विवान कारुळकर याने लिहिलेल्या सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस या पुस्तकाला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून विवानला अनेक दिग्गजांकडून कौतुकाची थापही मिळाली आहे. अशातच विवानच्या पुस्तकाला आता लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमधील रॉयल फॅमिलीकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. त्याला बॅज आणि नाणे देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही नाणी अत्यंत दुर्मिळ आहेत. या नाण्यांमध्ये राणीचा मुकुट असून तो टॉवर ऑफ लंडनवर देखील दिसून येतो. अशी नाणी फक्त तीन बनवली गेली असून यातील तिसरे नाणे विवानला सादर करण्यात आले आहे.

ही नाणी सरकारच्या सेवेचे प्रतीक आहेत. तसेच एलिझाबेथ II रेजिना (EIIR) आणि युनायटेड किंगडमच्या राजघराण्याशी जोडलेले आहे. राणीच्या निधनानंतर राजाचा राज्याभिषेक झाल्यानंतर तिच्या स्मरणार्थ, राजाने तीन बाजूंच्या नाण्यांची एक विशेष मालिका सुरू केली. यापैकीचं एक नाणे लंडनचे सिव्हिल सर्व्हंट रंगदत्त जोशी यांनी भेट दिले आहे. त्यांना हे नाणे बकिंगहॅम पॅलेस येथून मिळाले होते. हे नाणे विवान यालासंरक्षण अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे देऊन प्रमाणित केले आहे. विवान हे नाणे बैठका, सहल आणि अधिकृत भेटी दरम्यान बाळगू शकतो. हे नाणे प्राप्त झाल्यावर विवान करूळकर, प्रशांत कारुळकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.

लवकरच या पुस्तकाची मराठी आणि हिंदी आवृत्तीही वाचकांच्या भेटीला येणार आहे. विवान कारुळकरने लिहिलेल्या या पुस्तकाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले असून अवघ्या १६ व्या वर्षी हे पुस्तक लिहून सनातन धर्माचा प्रसार-प्रचार करत असल्याबद्दल शाबासकीही दिली आहे.

भारतीय सेनादलाने विवानला धार्मिक साहित्यात दिलेल्या योगदानाबद्दल पदक देऊन गौरविले. अवघ्या १७व्या वर्षी विवानने हा सन्मान प्राप्त केला आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात आले.

‘नासा’तील शास्त्रज्ञ मोहम्मद सैदुल अहसान व मोहम्मद सैफ आलम यांनीही विवानच्या पुस्तकाचे कौतुक केले. त्यांना हे पुस्तक प्रदान करण्यात आले. विवानचे पुस्तक स्वीत्झर्लंडमध्येही पोहोचले. स्वीत्झर्लंडच्या संसदीय समितीचे प्रमुख डॉ. निक गुग्गर यांनी विवानच्या या लेखनाचे कौतुक केले.

हे ही वाचा:

मोदी ३.O चे परिणाम शेअर बाजारात; सेन्सेक्स २६२१ वर उघडला

राहुल गांधी म्हणतात एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे

अजबच! उष्म्यामुळे चोर एसी लावून झोपला, पकडला गेला!

रविना टंडनला लोकांनी घेरले, तिच्या वाहनचालकाने धडक दिल्यामुळे झाला राडा!

देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनाही विवान याने त्याच्या पुस्तकाची प्रत प्रदान केली होती. त्यांच्याकडूनही त्याला शाबासकी मिळाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना राजभवन येथे या पुस्तकाची प्रत विवानने सहकुटुंब प्रदान केली तेव्हा राज्यपालांनी विवानच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आणि हाच नवा भारत असल्याची प्रतिक्रियाही दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विवानच्या पुस्तकाचे कौतुक केले.

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल यांनीही विवानचे या पुस्तकाबद्दल तोंडभरून कौतुक केले.जैन धर्माचे आचार्य महाश्रमणजी यांनीही पुस्तक पाहून विवानला भरपूर आशीर्वाद दिले. भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबईचे प्रभारी अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, सुशील कुल्हारी, राजस्थानचे आयकर खात्याचे प्रिन्सिपल डायरेक्टर सुधांशू शेखर झा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, मुंबई महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त प्रवीण परदेशी, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जितो संघटनेचे प.पू. गुरुदेव नयपद्मसागरजी, कस्टम विभागाचे आयुक्त अस्लम हसन, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे खासगी सचिव एस. के. जाधव यांनीही विवानच्या या प्रयत्नाबद्दल त्याला शाबासकीची थाप दिली.

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनीही या पुस्तकाचे खूप कौतुक केले आहे. तसेच प्रभू श्रीरामाच्या चरणांपाशी हे पुस्तक ठेवून भगवंतांचे आशीर्वादही घेतले आहेत. चंपतराय यांनी पुस्तकाबद्दल आपल्या भावना पहिल्या पानावर लिहिल्या असून त्यातून विवानच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

Exit mobile version