पाच वर्षेही झाली नाहीत तोवर कोसळला पूल

गुरुवारी खांब क्रमांक २ आणि ३ मध्ये तडे गेले आणि वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली

तुम्ही एक प्रसिद्ध कविता ऐकली असेलच ‘लंडन ब्रिज इस फॉलिंग डाऊन’ , ती जवळजवळ खरी झाली आहे पण बिहारमध्ये… बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात रविवारी एका बांधकामाधीन पुलाचा काही भाग कोसळला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे लवकरच उदघाटन होणार होतं.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, साहेबपूर कमलजवळ असलेल्या बुर्ही गंडक नदीवर २०६ मीटर लांबीचा पूल बांधण्यात येत होता. हा पूल राज्य सरकारच्या रस्ते बांधकाम विभागच्या (आरसीडी) अंतर्गत मा-भगवती कन्स्ट्रक्शन द्वारे सुमारे १३ कोटी खर्चून बांधला जात होते. अहवालात म्हटले आहे की गुरुवारी खांब क्रमांक २ आणि ३ मध्ये तडे गेले आणि वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. नशिबाने कोणतीही जीवितहानी या घटनेत झालेली नाही.

“पुलाचे उद्घाटन झाले नसले तरी, हा पूल सुमारे २० हजार लोकसंख्येच्या तीन पंचायतींना जोडण्याचे करत होता,” अधिकाऱ्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की मेटल अप्रोच रोडच्या बांधकामानंतर उद्घाटन नियोजित होते. ” वाहतुकीला कडक बंदी नसती तर जीवितहानी आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असते”, असा स्थानिकांचा आरोप आहे.

हे ही वाचा:

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आठ जणांना अटक

कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा, काँग्रेसला मळमळ

आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु

मेस्सीचे वर्ल्डकपमध्ये अनेक विक्रम; एकाच स्पर्धेत सर्व फेऱ्यांत गोल नोंदविणारा एकमेव खेळाडू

२०१६ मध्ये या काँक्रिटच्या पूलाचे काम पूर्ण झाले आणि २०१७ पासून उद्घाटन न होताच गावकरी या पुलावरून पायी जात होते. हलकी वाहनेही त्या पुलावरून जात होती असे दिसण्यात आले आहे. या घटनेबद्दल चर्चा करताना स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणाले की, “आम्ही बांधकामात वापरल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या साहित्याविरोधात आवाज उठवला पण कोणीही ऐकले नाही. हा पूल पाच वर्षेही टिकू शकला नाही ही चिंतेची बाब आहे. आम्ही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करतो.”

Exit mobile version