27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषनवरी नटली आणि परीक्षेला बसली

नवरी नटली आणि परीक्षेला बसली

Google News Follow

Related

लग्न हा कोणत्याही मुलीच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी क्षणांपैकी एक असतो. प्रत्येक मुलगी आपल्या लग्नाचा दिवस यादगार व्हावा यासाठी खूप स्वप्न रंगवते. पण लग्नाच्या दिवशी जर तिला परीक्षेला जाणे भाग पडले तर मात्र तिच्यासमोर एक मोठी द्विधा मनस्थिती आणि कठीण परिस्थिती उभी राहते. पण अशाच परिस्थितीतून मार्ग काढत सर्व मुलींसमोर एक नवा आदर्श घालून दिलाय गुजरात मधल्या राजकोट मधील शिवांगी बघतारिया नावाच्या तरुणीने.

गुजरातच्या राजकोट भागात राहणारी शिवांगी बघतारिया ही तरुणी बीएसडब्ल्यू बॅचलर ऑफ सोशल वर्क (BSW) या पदवी अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षात शिकत आहे. पण हे शिक्षण घेतानाच तिचे लग्न ठरले. लग्नाची तारीख ठरली, मुहूर्त निश्चित झाला. अशातच तिची पाचव्या सेमिस्टरची परीक्षा लागली. लग्न ठरले तेव्हा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले नव्हते. पण आता लग्नाची तारीख आणि परीक्षेची तारीख एकाच दिवशी येत होती. इतकंच नाही तर लग्नाचा मुहूर्त आणि पेपरची वेळ देखील एकच होती.

हे ही वाचा:

एमआयएमने पुन्हा दिली मुस्लिम आरक्षणाची बांग! ११ डिसेंबरला मोर्चा!

‘पाकिस्तानवर कारवाई न करणे ही मनमोहन सिंग सरकारची कमजोरी’

ती मैदानात आली आणि बसली विराटच्या मांडीवर! अनुष्का म्हणाली…

जेव्हा शरद पवारांच्या सरकारने केलेला गोवारी समाजावर लाठीचार्ज!

अशा वेळी नेमके काय करावे असा मोठा प्रश्न समोर उभा राहिला. लग्नाचा मुहूर्त बदलता येईल का या संदर्भात आपल्या घरच्या आणि होणाऱ्या सासरच्या मंडळींची चर्चा केली. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने लग्नाचा मुहूर्त बदलण्यात आला. शिवांगीच्या सासरच्या मंडळींनीही तिला सकारात्मक प्रतिसाद दिला. मग शिवांगी लग्नाच्या तिचा पेहरावातच परीक्षा केंद्रावर दाखल झाली आणि वधूच्या वेषातच तिने आपला पेपर दिला. यावेळी तिच्या माहेरची आणि सासरची मंडळी तिथे उपस्थित होते.

शिवांगीच्या या कृतीची सर्वत्र चर्चा होत असून तिचे कौतुक होताना दिसत आहे. एकिकडे शिक्षणाला प्राधान्य देऊन मुलींमधील शिक्षणाचे प्रमाण वाढावे यासाठी सरकारी पातळीवरूनही खूप प्रयत्न होत आहेत. बेटी बचाओ, बेटी पढाओ सारखे कार्यक्रम सरकार हाती घेत आहे. अशातच शिवांगी सारखी उदाहरणे समाजात परिवर्तन घडवण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा