लाचेचे लोण उत्तर रेल्वेतही, तीन अधिकाऱ्यांना अटक

लाचेचे लोण उत्तर रेल्वेतही, तीन अधिकाऱ्यांना अटक

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ७ लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली उत्तर रेल्वेचे तीन अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीस अटक केली आहे. ही कारवाई सीबीआयने सखोल तपासानंतर केली असून, आरोपींनी लाच म्हणून ७ लाख रुपयांची देवाणघेवाण केली होती. सीबीआयने आरोपींच्या ठिकाणांवर झडती घेतली. या कारवाईत सुमारे ६३.८५ लाख रुपये रोख रक्कम, सुमारे ३.४६ कोटी रुपयांचे सोन्याचे साचे आणि दागिने जप्त करण्यात आले.

गिरफ्तार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दिल्लीतील डीआरएम कार्यालयात कार्यरत उत्तर रेल्वेचे वरिष्ठ डीईई (जनरल) साकेत चंद श्रीवास्तव आणि एसएसई (इलेक्ट्रिकल – जी शाखा) अधिकारी तपेंद्र सिंह गुर्जर यांचा समावेश आहे. तिसरा आरोपी अरुण जिंदल हा एसएसई (निविदा विभाग प्रमुख) म्हणून कार्यरत होता. या तिघांवर ठेकेदारांकडून आणि खासगी व्यक्तीकडून लाच घेतल्याचा आरोप आहे.

हेही वाचा..

दहावी, बारावी बोर्डाची वेबसाईट सायबर सुरक्षित करा !

विवान कारुळकरचा ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे सन्मानचिन्ह देऊन गौरव

कुठल्यातरी सोम्या-गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्याच्या झालेल्या कार्यकर्त्यांनी…

याशिवाय, सीबीआयने मेसर्स वत्सल इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड, दिल्ली येथील गौतम चावला यालाही अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एक नाव समोर आले असून, साकेत कुमार हे मेसर्स शिवमणि एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. एफआयआरमध्ये अन्य खासगी व्यक्ती आणि सरकारी सेवकांचाही उल्लेख असून, त्यांच्याविरोधात तपास सुरु आहे.

सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रे आणि मालमत्तेच्या आधारे पुढील तपास केला जाईल. प्राथमिक तपासात असे आढळले आहे की, आरोपी अधिकारी आणि खासगी व्यक्तींमध्ये शासकीय खरेदी आणि ठेकेदारीशी संबंधित लाच देणे-घेणे एक संगठित पद्धतीने सुरु होते. सीबीआयने या प्रकरणातील इतर आरोपी आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरु केली आहे.

Exit mobile version