देशभरात कोरोना रुग्णवाढीत घट

देशभरात कोरोना रुग्णवाढीत घट

देशातील अनेक राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे देशातील वाढत्या कोरोना रुग्णवाढीला काहीसा ब्रेक लागला आहे. गेल्या दोन दिवसात भारतातील कोरोनाबाधितांमध्ये घट झाली आहे. भारतात गेल्या २४ तासात ३ लाख ५७ हजार २२९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या २४ तासात ३ लाख ५७ हजार २२९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही २ कोटी २ लाख ८२ हजार ८३३ पर्यंत पोहोचली आहेत. तर दुसरीकडे ३४४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना मृतांचा आकडा हा २ लाख २२ हजार ४०८ इतका झाला आहे.

हे ही वाचा:

देशव्यापी लॉकडाऊन करा

आयपीएल २०२१ कोरोनामुळे रद्द

लक्षात ठेवा, टीएमसीचे खासदार, मुख्यमंत्री दिल्लीतसुद्धा येतात- प्रवेश सिंह वर्मा

मुंबईत ‘ड्राईव्ह इन’ लसीकरणाला सुरवात

तसेच भारतातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. काल दिवसभरात ३ लाख २० हजार २८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही १ कोटी ६६ लाख १३ हजार २९२ इतकी झाली आहे. तर सद्यस्थितीत राज्यात ३४ लाख ४७ हजार १३३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे. दरम्यान भारतात आतापर्यंत १५ कोटी ८९ लाख ३२ हजार ९२१ जणांना कोरोनाची लस घेतली आहे.

Exit mobile version