पावाचे वाढले ‘भाव’ देवा आता धाव

भूक भागावणाऱ्य पावाचे वाढले 'भाव'

पावाचे वाढले ‘भाव’ देवा आता धाव

पाव म्हटलं की आपल्या समोर येतो तो वडापाव, मिसळपाव, कांदाभाजी आणि बरंच काही. मुंबईकरांमध्ये अगदी घराघरात पाव आणला जातो, लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत पाव खाल्लाही जातो. एरवी २ ते अडीच रुपयांना मिळणारा पाव आता पाच रुपयाला मिळणार आहे.

मुंबईच्या काही भागात किरकोळ विक्रेत्यांकडून ५ रुपये प्रति नग अशी किंमत आकारली जाते. अंधेरी लोखंडवाला भागात पावाचे दर हे ७ ते ८ रुपये प्रति नग आहे तर विलेपार्ले येथे पावाचे भाव ३ रुपयांवरून ४ करण्यात आले आहे तर माहिम व नागपाडा भागात पूर्वी २.५० रुपयांच्या तुलनेत ३ रुपये आकारण्यात येत आहेत. तसेच बेकरी आणि पुरवठादारांनी अलीकडेच ऑक्टोबर महिन्यात ५० पैशांवरून १ रुपया प्रति नग असे भाव वाढवले आहेत. कच्च्या मालाचे दर वाढवण्यात आल्यामुळे पावाचे दर वाढवण्यात आले आहे असे पुरवठादार व विक्रेत्यांनी सांगितले.

कच्च्या मालापासून ते मजूर आणि वाहतुकीपर्यंत सर्वच दर वाढल्यामुळे हे दर वाढवण्यात आले आहेत. तर ५० किलो मैद्याच्या पोत्याचा भाव लॉकडाऊननंतर १२०० रुपयांपासून १७०० रुपयांपर्यत वाढला आहे. तसेच लॉकडाऊन पूर्वी ३०० रुपये असलेली मजुरी आता ४०० रुपये झाली आहे. खाद्य तेलाचे भावही १००० रुपयांवरून १६०० ते १७०० रुपये असे वाढले आहेत. नव्या धोरणांमुळे पॅकिंगसाठी जाड थरांच्या पिशव्या वापराव्या लागतात. यामुळे माहीमच्या डेल्व्हिन बेकरीने पावाचे तर २.५० रुपयांपासून ३ रुपये केले आहेत.

हे ही वाचा:

प्रकल्प महाविकास आघाडीमुळेच गेल्याचे आरटीआयमधून आले समोर

एन्रॉन प्रकल्प पुन्हा सुरु होण्याचे संकेत

मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश

भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची

भाववाढीमुळे काही बेकरीवाल्यांनी पावाचे दर न वाढवता पावाचे आकारमान व वजन कमी केले आहेत. दर वाढवले तर ग्राहक पाव घेणार नाहीत असे बेकरी उत्पादकांचे म्हणणे आहे.

Exit mobile version