मेस्सी की नेमार? उद्या ठरणार

मेस्सी की नेमार? उद्या ठरणार

रविवार, ११ जुलै रोजी दक्षिण अमेरिकन फुटबॉल मधील बादशाह कोण हे ठरणार आहे. रविवारी कोपा अमेरिका या फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार असून ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत. त्यामुळे स्पर्धेचा हा अंतिम सामना जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणी असणार यात शंकाच नाही. भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ५.३० वाजता हा सामना सुरु होणार आहे.

जून आणि जुलै हे दोन्ही महिने जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी अतिशय खास ठरले. एकीकडे युरोपमधील युरो कप फुटबॉल स्पर्धा सुरू झाली. तर दुसरीकडे अमेरिकेतील संघांमध्ये कोपा अमेरिका स्पर्धा रंगली होती. पण आता या दोन्ही स्पर्धांचे अंतिम फेरीचे सामने शिल्लक आहेत. १४ जून पासून कोपा अमेरिका स्पर्धेला सुरुवात झाली असून आता या स्पर्धेचा अंतिम सामना होऊ घातला आहे. १० संघांमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन तगडे संघ अंतिम फेरीत दाखल झाले आहेत.

हे ही वाचा:

२४ तासांत मालिकेच्या वेळापत्रकात दोनदा बदल

लवकरच १५% नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी?

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य पी. के. वॉरिअर यांचे निधन

उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण विधेयक?

जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंपैकी एक असणाऱ्या लियोनेल मेस्सीच्या नेतृत्वात खेळणारा अर्जेंटिना संघ आणि नेमारचा ब्राझील हे दोन्ही संघ सुरुवातीपासूनच या स्पर्धेत अग्रणी राहिले आहेत. गेल्या चार सामन्यांचा या संघांचा रेकॉर्ड पाहिला तर या दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकले असून एक सामना हा बरोबरित सुटला आहे. म्हणजेच गेल्या चार सामन्यात या दोन्हीपैकी कोणताही संघ पराभूत झालेला नाही. त्यामुळे हा सामना अतिशय रोमांचक होणार हे स्पष्टच आहे. तर या सामन्याचा निकाल लागून नेमका कोणता संघ अमेरिकन फुटबॉलधील दादा ठरणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे.

Exit mobile version