पश्चिम उपनगरातील एका पबमध्ये सुरू असलेल्या राड्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, हा राडा झाला शॅम्पेन उडाल्यावरून तरुणांच्या एका ग्रुपने शॅम्पेन फोडली आणि ही शॅम्पेन दुसऱ्या तरुणांच्या अंगावर उडाली आणि त्यावरून राडा होऊन पबमधील बाऊसंर यांनी एका ग्रुपला रॉडने मारहाण केली. वांद्र्याच्या एस्कोबार पब मध्ये झालेल्या या राड्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहा बाऊसंर आणि व्यवस्थापकाला अटक केली आहे.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बार कर्मचारी आणि ग्राहक एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेतली असता शुक्रवारी वांद्रे पश्चिम येथील ‘एस्कोबार पब’मधील हा राडा झाला आहे.
हे ही वाचा:
दापोली हर्णे मार्गावरील अपघातात ८ ठार, नातेवाईकांना ५ लाख
‘बराक ओबामांमुळे सहा मुस्लिम राष्ट्रांवर बॉम्बहल्ला’
मल्लिकार्जुन खर्गेंचे पुत्र प्रियांक खर्गे म्हणतात, गोरक्षांना लाथ मारा ,तुरुंगात टाका !
कुस्तीगीरांचे आंदोलन मागे, मात्र आता न्यायालयाची लढाई
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार खार मध्ये राहणाऱ्या तरुण तरुणीचा एक ग्रुप वांद्र्याच्या एस्कोबार पब मध्ये शुक्रवारी दुपारी पार्टी करण्यासाठी गेले होते. पार्टी दरम्यान या ग्रुपने शॅम्पेन फोडली आणि ही शॅम्पेन दुसऱ्या ग्रुपमधील तरुणांच्या अंगावर सांडली, पहिल्या ग्रुपने याबद्दल माफी मागितल्यावर प्रकरण वाढले नाही. परंतु काही वेळाने दुसऱ्या गृप मधील तरुणाने शॅम्पेन फोडणाऱ्या ग्रुप मधील तरुणांना जाब विचारला व त्यातुन शाब्दिक वाद सुरू झाला.
या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, त्यानंतर पबच्या बाऊन्सर यांनी हस्तक्षेप करून एका ग्रुपच्या तरुणांना मारहाण करू लागले, बाऊन्सर यांच्याकडून रॉडचा वापर करण्यात आला. अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले आणि वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी पब च्या बाऊन्सर आणि व्यवस्थापक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून रविवारी सहा बाऊन्सर आणि व्यवस्थापक यांना अटक करण्यात आली.