‘स्वतःच्या मुलाला काही शिकवले नाही, तुमच्या चाहत्यांच्या मुलांना कसे शिकविणार’

‘स्वतःच्या मुलाला काही शिकवले नाही, तुमच्या चाहत्यांच्या मुलांना कसे शिकविणार’

बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळख असलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झाल्यानंतर शाहरुख खानची ब्रँड व्हॅल्यू धोक्यात आल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकरणानंतर चाहत्यांनी शाहरुख जाहिरात करत असलेल्या ब्रँड्सवरही प्रश्नांच्या तोफा डागल्या आहेत. ब्रँड्सला ट्रोलही केले जात आहे. एका एज्युकेशनल स्टार्ट- अपची जाहिरात करणाऱ्या शाहरुखला उद्देशून, ‘तुम्ही स्वतःच्या मुलाला काही शिकवू शकला नाही, तुमच्या चाहत्यांच्या मुलांना कसे शिकविणार’, असा सवाल ट्रॉलर्सनी केला आहे.

शाहरुख खान हा विराट कोहली, अक्षय कुमार, रणवीर सिंग यांच्या तुलनेत ज्येष्ठ असला तरी ब्रँड व्हॅल्यूसाठी तो तिघांशीही स्पर्धा करतो. ‘डफ अँड फ्लॅप्स’ या बहुराष्ट्रीय वित्तीय सल्लागार संस्थेने फेब्रुवारी २०२१ मध्ये दिलेल्या माहितीनुसार शाहरुख खान याची ब्रँड व्हॅल्यू या क्षणाला ३७८ कोटी रुपये आहे.

हे ही वाचा:

ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!

मुंबई पालिका म्हणतेय, छट्, तिसरी लाट वगैरे काही येणार नाही!

डॉक्टरांनी सरकारची नस अचूक पकडली; पुन्हा कामावर रुजू होणार

‘हा’ अवलिया बेटावर तब्बल ३२ वर्षे एकटाच राहत होता… वाचा सविस्तर

जगभरातील कमाईच्या दृष्टीने टॉप टेनच्या यादीत भारतातील अभिनेत्यांमध्ये शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन या दोघांचा समावेश आहे. शाहरुख खान हा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर अमिताभ बच्चन हे आठव्या स्थानी आहेत. शाहरुख याची एकूण संपत्ती ५ हजार ११६ कोटी इतकी आहे. जाहिरातीसाठी एका दिवसाच्या शुटींगचे शाहरुख चार कोटी घेतो असे सांगण्यात येते.

बायजू या एका शैक्षणिक अ‍ॅपचा शाहरुख मॉडेल असून लोकांनी थेट कंपनीच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करून कंपनीने शाहरुखबाबत पुनर्विचार करावा, असे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुख आणि अजय देवगण यांनी मिळून ‘विमल’ पुडीची जाहिरात केली होती. इतरांच्या मुलांना गुटखा खायला शिकवाल तर तुमची मुले ड्रग्स घेतील म्हणून सावधान… व्यसनांना प्रोत्साहन देऊ नका, असा सल्लाही ट्रोलर्सनी दिला आहे.

Exit mobile version