ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा वापर भारतविरोधी राष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी

ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा वापर भारतविरोधी राष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी

भारताला मोठ्या प्रमाणात ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तयार करायची आहेत. जेणेकरून इतर कोणत्याही देशाची भारताकडे नजर वाकडी करून बघण्याची हिंमत होणार नाही. असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सांगितले. अण्वस्त्र प्रतिबंधक राखण्याच्या गरजेवर जोर देऊन सिंग म्हणाले की, भारत ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रे कोणत्याही देशावर हल्ला करण्यासाठी नाही तर “भारताच्या शत्रू राष्ट्रापासून” आपल्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी तयार करत आहे.

सिंग म्हणाले, “इतर कोणत्याही देशावर हल्ला करणे किंवा कोणत्याही देशाची एक इंचही जमीन बळकावणे हे भारताचे चरित्र कधीच नव्हते.आम्हाला ब्रह्मोस भारतीय भूमीवर बनवायचे आहे जेणेकरून कोणत्याही देशाची भारताकडे नजर वाकडी करून बघण्याची हिंमत होणार नाही.”

पाकिस्तानचा उल्लेख करत राजनाथ सिंह म्हणाले की, काही काळापूर्वी भारतापासून विभक्त झालेल्या शेजारी देशाचे हेतू भारताबाबत नेहमीच वाईट असतात. त्यांनी उरी आणि पुलवामा येथे दहशतवादी कारवायाही केल्या आहेत. असं सिंग पुढे म्हणाले.

“म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्णय घेतला आणि आम्ही त्यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. जेव्हा हवाई हल्ल्याची गरज होती तेव्हा आम्ही ते यशस्वीपणे केले. आम्ही संदेश दिला की जर कोणी दुष्कृत्य करण्याचे धाडस केले तर परिणाम वाईट होतील. सीमेच्या या बाजूलाच नाही, तर आम्ही पलीकडे जाऊन त्यांना मारू शकतो, ही भारताची ताकद आहे.” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

१५-१८ वयोगटातील मुलांची १ जानेवारीपासून करा नोंदणी

पुण्यात ATM फोडले, १६ लाखांची चोरी

विधिमंडळात ‘सरकार हरवले आहे’ चे शर्ट

बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम आहे तरी कोण?

संरक्षण तंत्रज्ञान आणि चाचणी केंद्र आणि ब्रह्मोस उत्पादन केंद्राच्या पायाभरणीसाठी संरक्षण मंत्री लखनौमध्ये होते. ब्रह्मोस मॅन्युफॅक्चरिंग सेंटर हे उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या लखनौ नोडमध्ये २०० एकरपेक्षा जास्त क्षेत्र व्यापलेले आधुनिक, अत्याधुनिक सुविधा आहे.

Exit mobile version