ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवर उत्पादनांच्या कंपनीला अनेकदा विरोध झाला आहे. कधी कोणत्याही राज्याच्या ध्वजावर तर कधी देव आणि देवांशी संबंधित उत्पादनाबाबत अमॅझॉनवर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर लोक अमेझॉनच्या बॉयकॉट ची मागणी करत आहेत.
अमेझॉनच्या बॉयकॉट आणि बॉयकॉट एस्कोटीक इंडिया हे ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. याचे कारण म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी कंपनीकडून राधा-कृष्णाच्या आक्षेपार्ह पेंटिंगची विक्री करण्यात आल्याचा आरोप अॅमेझॉनवर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे जन्माष्टमीच्या सेलदरम्यान एक्झॉटिक इंडियाच्या वेबसाइटवरही हे आक्षेपार्ह पेंटिंग विकले जात होते. त्याच वेळी, बेंगळुरू येथील एका विक्रेत्याकडून अॅमेझॉनवर त्याची विक्री केली जात होती. यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अमेझॉन आणि एक्झॉटिकवर निशाणा साधला. हिंदु जनजागृती समितीनेही कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. समितीने बेंगळुरूमधील सुब्रमण्यम नगर पोलिस स्टेशनला निवेदन सादर करून अॅमेझॉनवर कारवाई करण्याची विनंती केली. तसेच, कंपनीविरोधात पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत हे आक्षेपार्ह चित्र लवकरात लवकर हटवण्याची मागणीही त्यांनी केली.
It was brought to our notice that an inappropriate image was uploaded on our website. The same was brought down immediately.
We sincerely apologise,Pls dont #Boycott_ExoticIndia #boycott_exoticlndia
Hare Krsna. 1/2 @HinduJagrutiOrg @SanatanPrabhat @mp_hjs— Exotic India Art (@exoticindiaart) August 19, 2022
हे ही वाचा:
मुंबई मे हमला होने जा रहा है, २६-११ की याद दिलाएगा
मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर
‘फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू’
१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?
हिंदू संघटनेने नंतर एका ट्विटमध्ये दावा केला मोठा गदारोळ झाल्यानंतर आणि ट्विटरवर #Boycott_Amazon ट्रेंड करू लागल्यानंतर अॅमेझॉन आणि एक्झॉटिक इंडियाने हे पेंटिंग मागे घेतले आहे. याप्रकरणी एस्कोटीक इंडियाने ट्विट करून माफीही मागितली आहे. मात्र अमेझॉनने या प्रकरणी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अमेझॉनचा जोरदार विरोध होत आहे.