भारताने क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी करत जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने ही कामगिरी केली असून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. तसेच जागतिक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ही पाचवी भारतीय महिला ठरली आहे.
निखत झरीनने ५२ किलो गटात महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या जुतामास जितपाँगला ५-० ने पराभूत केलं. आतापर्यंत सहा वेळा विजेती एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या महिला बॉक्सिंगपटूंनी जागतिक विजेतेपदे पटकावली आहेत. यांच्या यादीत आता निखत झरीनचा समावेश झाला आहे.
ONE FOR THE HISTORY BOOKS ✍️ 🤩
⚔️@nikhat_zareen continues her golden streak (from Nationals 2021) & becomes the only 5️⃣th 🇮🇳woman boxer to win🥇medal at World Championships🔥
Well done, world champion!🙇🏿♂️🥳@AjaySingh_SG#ibawwchs2022#IstanbulBoxing#PunchMeinHaiDum#Boxing pic.twitter.com/wjs1mSKGVX
— Boxing Federation (@BFI_official) May 19, 2022
दरम्यान, उपांत्य सामन्यात निखतने दमदार खेळ करत ब्राझिलच्या कॅरोलिन डी अल्मेडा विरोधात ५-० असे यश मिळवले होते. अंतिम सामन्यातही आपला खेळात सातत्य राखत निखतने थायलंडच्या जुतामास जितपाँगला पराभूत करून सुवर्णपदक आपल्या नावे केलं.
हे ही वाचा:
आत्मनिर्भर 5G ची IIT मद्रासमध्ये यशस्वी चाचणी
आमच्याकडे तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचेही संख्याबळ आहे
काँग्रेसचे जोखड सोडल्यावर जाखड भाजपावासी
‘काँग्रेस हा सर्वात मोठा जातीयवाद पक्ष’
निखत झरीनने अलीकडेच Strandja मेमोरिअल येथे पदक जिंकले होते आणि येथे दोन सुवर्णपदके जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. त्यामुळे आता विश्वविजेती बनल्यानंतर निखत झरीनकडून अपेक्षा वाढल्या आहेत.