आयर्लंड दौऱ्यात बुमराह कमाल करणार?

वर्षभरानंतर वेगवान गोलंदाज उतरणार मैदानात

आयर्लंड दौऱ्यात बुमराह कमाल करणार?

भारत विरुद्ध आयर्लंड संघाच्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेला १८ ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे.भारतीय संघ या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. या मालिकेत आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाची कमान जसप्रीत बुमराह सांभाळणार आहे. आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्याला या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. दुखापतीनंतर बुमराह जवळपास वर्षभरानंतर क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे.याआधी बुमराहने २२ सप्टेंबर २०२२ रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.यानंतर आशिया कप, आयसीसी टी-२० विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये तो भारतीय संघाचा भाग नव्हता.

गेल्या दीड वर्षांपासून बुमराह दुखापतींनी त्रस्त असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला विश्रांती देत संघात स्थान दिले नाही. त्यानंतर आता बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त होऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे.बुमराह ज्यापद्धतीने नेटमध्ये प्रॅक्टिस करताना दिसत आहे त्याप्रमाणे आताही तो पाहिल्यासारखिच गोलंदाजी करताना दिसून येत आहे. बुमराह त्याच्या यॉर्कर्स आणि डॅशिंग बाउन्सरसाठी ओळखला जातो.बुमराहचे पुनरागमन ही टीम इंडियासाठी चांगली बातमी आहे, कारण आशिया कप या महिन्याच्या ३० तारखेपासून खेळला जाणार आहे आणि त्यानंतर ५ ऑक्टोबरपासून भारतात विश्वचषक खेळला जाणार आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या टोल कर्मचाऱ्याला घेतले ताब्यात !

मुख्यमंत्र्यांना चेकमेट देण्याचा प्रयत्न कोणाचा?

बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी प्रेयसीने त्याच्या मुलाचा घेतला जीव !

विनयभंग प्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटेला अटक !

भारत विरुद्ध आयर्लंड मालिकेची सुरुवात १८ ऑगस्ट रोजी डबलिन येथे होणार आहे. २० ऑगस्ट रोजी दुसरा आणि २३ ऑगस्ट रोजी तिसरा टी-२० सामना होणार आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल आणि जितेश शर्मा या खेळाडूंना टीम इंडियात स्थान दिले आहे. त्याशिवाय मुकेश कुमार, शाहबाज अहमद आणि शिवम दुबे यांनाही संधी देण्यात आली आहे.मॅचविनर जसप्रीत बुमराहचे संघातील पुनरागमन आशिया आणि वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.अनेक दिवसानंतर जसप्रीत बुमराह मैदानावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे बुमराहला पुन्हा एकदा खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन, जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आवेश खान.

Exit mobile version