मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये दोघांनी संपवले जीवन

एकाच दिवशी दोन तरुणांची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये दोघांनी संपवले जीवन

मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणात पेटलेला असताना मराठा आंदोलकांकडून मराठा आरक्षणाची मागणी आणखी तीव्र होत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील लोकांच्या आत्महत्या सुरुच आहेच.

नांदेडमध्ये एका तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तरुणाच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट सापडली असून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने विहिरीत उडी मारून जीव देत असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.

ओमकार आनंदराव बावणे (वय १६) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ओमकार याने रविवार, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी गावाशेजारील जंगली पीरजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, मृत्यूपूर्वी ओमकारने विहिरीवर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. विहिरीवर लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, “माझे आई वडिल मोलमजुरी करून आम्हाला शिक्षण शिकवत होते. पण त्यांची परिस्थिती मला पाहवत नव्हती म्हणून आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे”.

हे ही वाचा:

राहुल गांधींकडून अग्निवीरच्या बाबतीत खोटे आरोप

स्वीडनमध्ये इराकी व्यक्तीने इस्रायलच्या ध्वजाचे घेतले चुंबन!

समलिंगींच्या बाबतीत ओढूनताणून कायदे करण्याची गरज काय?

पुण्यात विमान कोसळलं, तीन जण जखमी!

दरम्यान, रविवारी एकाच दिवशी नांदेड जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. नांदेडमधील आणखी एका तरुणाने विष प्राशन करुन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. तरुणाच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट देखील सापडली होती. नांदेडमधील हदगांव तालुक्यातील वडगाव इथल्या शुभम सदाशिव पवार या तरुणाने आत्महत्या केली. शुभमने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती.

Exit mobile version