आदिवासी विकास विभाग कार्यालयाबाहेर आंदोलन, आत साहेबांचा ‘बड्डे’!

व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होताच अधिकाऱ्याचं कर्मचाऱ्यांवर खापर

आदिवासी विकास विभाग कार्यालयाबाहेर आंदोलन, आत साहेबांचा ‘बड्डे’!

आदिवासी विकास विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.आदिवासी विभागाचे उपआयुक्त सुदर्शन नगरे यांचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात आणि तेही कार्यालयातच केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.विशेष म्हणजे आदिवासी मुख्यालयाबाहेर आंदोलन चालू असताना कार्यालयात उपायुक्तांच्या वाढदिवसाची तयारी सुरु होती.

नाशिकमध्ये आदिवासी विभागाचे मुख्यालय आहे.या मुख्यालयातच उपआयुक्त सुदर्शन नगरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. एकीकडे राज्यातील आदिवासी आपल्या अनेक समस्या घेऊन आदिवासी विकास विभाग मुख्यालयात येत असतात.तर दुसरीकडे त्याच कार्यालयात साहेबांचे वाढदिवस साजरे केले जात आहेत.या वाढदिवसाची चर्चा मात्र सर्वत्र जोरदार सुरू आहे.कर्मचाऱ्यांकडून साहेबांची केबिन, टेबल सर्वकाही फुलांनी सजविण्यात आले होते.एवढंच नाही तर कर्मचाऱ्यांनी  कोल्ड फायर लावून साहेबांच्या वाढदिवसाला चार चांद लावून टाकले.

उपआयुक्त सुदर्शन नगरे यांचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.विशेष म्हणजे एकीकडे कार्यालयात साहेबांच्या वाढदिवसाची तयारी सुरु होती तर दुसरीकडे कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु होते.

हे ही वाचा:

राम भक्ताची होणार संकल्पपूर्ती; राम मंदिरासाठी ३१ वर्षांपासून आहेत अनवाणी

रामलल्लाची मूर्ती अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात दाखल

उदयनिधी स्टॅलिन पुन्हा बरळले, म्हणाले- मशीद पाडून मंदिर बांधणे मान्य नाही!

थलसेना दिवसाचा अमृतमहोत्सव रक्तदान, शस्त्रप्रदर्शनाला गणेश नाईक, समीर वानखेडेंची उपस्थिती

एबीपी माझाच्या बातमीनुसार, या संदर्भात आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांच्याशी संपर्क साधला असता.त्या म्हणाल्या की, उपआयुक्त सुदर्शन नगरे यांच्या वाढदिवसाची माहिती न्हवती.तसेच नगरे यांचा वाढदिवस एवढ्या मोठ्यात साजरा केला जाईल याचीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, ज्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला ते उपआयुक्त सुदर्शन नगरे यांच्याशी देखील संपर्क साधण्यात आला. सुदर्शन नगरे म्हणाले की, माझा वाढदिवस एवढ्या मोठ्यात साजरा केला जाईल याची मलाही कल्पना न्हवती.परंतु कर्मचाऱ्यांना मी बजावून सांगितले की, शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरा करणे हे चुकीचे आहे.एखादा बुके वगैरे देऊन बर्थडे सेलेब्रेशन करणे ठीक आहे.कर्मचाऱ्यांचा उत्साह असल्याने मी त्यांना जास्त बोललो नाही.पण त्यांना बजावून सांगितले, माझा अथवा कोणाचाही वाढदिवस असो एवढ्या मोठ्या पद्धतीने कार्यालयात साजरा करायचे नाही.पुन्हा अशी चूक होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असे सुदर्शन नगरे म्हणाले.

Exit mobile version