बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या स्पर्धेसाठीसुरू असलेल्या सिडनी कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेट्सनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने या कसोटी विजयासह पाच सामन्यांची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. याशिवाय ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक मारली आहे. या स्पर्धेचा पहिला सामना भारताने जिंकला होता तर, दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. तिसरा सामना बरोबरीने सुटला होता. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारत आघाडी घेतली. त्यामुळे पाचव्या सामन्यात भारतासमोर करो या मरो अशी स्थिती होती. मात्र, भारतीय खेळाडू फारशी चमकदार कामगिरी करू शकले नाहीत आणि ही मालिका गमवावी लागली.
नियमित कर्णधार रोहित शर्मा याने स्वतःहून या सामन्यात विश्रांती घेतली. त्यामुळे जसप्रीत बुमरा याच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात केवळ १८५ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात भारताचा फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत याने सर्वाधिक ४० धावा केल्या. तर, रवींद्र जडेजाने २५ धावा, शुभमन गिल याने २० धावा केल्या. विराट कोहली केवळ १७ धावा करू शकला. गोलंदाज आणि कर्णधार जसप्रीत बुमरा याने शेवटाकडे २२ धावा जोडत फलकावर अतिरिक्त धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँड याने सर्वाधिक चार फलंदाज बाद केले. तर, मिशेल स्टार्क याने तीन विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्स आणि नाथन लायन यांनी अनुक्रमे दोन आणि एक फलंदाजांना माघारी धाडले.
यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी १८१ धावा केल्या. लक्ष्य पार करायला चार धावा कमी पडल्याने सामना भारताच्या बाजूने वळेल अशी स्थिती निर्माण झाली होती. ऑस्ट्रेलियाकडून सलामीला आलेल्या सॅम कोनस्टास याने २३ धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथ याने ३३ धावा केल्या. ब्यू वेबस्टर याने ५७ धावा केल्या. एलेक्स कॅरे याने २१ धावांची खेळी केली. बाकी फलंदाजांची फारशी साथ मिळाली नसल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ १८१ धावा करू शकला. भारताकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट्स घेतल्या. तर, रेड्डी आणि बुमरा यांनी दोन दोन फलंदाजांना माघारी धाडले.
चार धावांची लीड घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची दुसऱ्या डावातही कामगिरी सुमार राहिली. सलामीला उतरलेले यशस्वी जैस्वाल आणि के एल राहुल यांनी २२ आणि १३ धावा करत तंबू गाठला. शुभमन गिल, विराट कोहली यांनीची फारशी चमकदार कामगिरी केली नाही. रिषभ पंत याने फटकेबाजी करत भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ३३ चेंडूत रिषभ याने ६१ धावा केल्या. यानंतर मात्र कोणत्याही खेळाडूला चमकदार कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँड याने भारताचे सहा फलंदाज बाद केले. तर पॅट कमिन्स याने तीन विकेट्स घेतल्या. भारतीय संघ दुसऱ्या डावात केवळ १५७ धावा करू शकला.
हे ही वाचा..
फडणवीसांच्या जय जयकाराची स्क्रीप्ट नेमकी कोणाची?
“दिल्लीकरांच्या पैशांनी बांधलेल्या शीशमहालाचा हिशोब केजरीवालांनी द्यावा”
“गावे स्वावलंबी असतील तेव्हाच देश स्वावलंबी होईल”
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुलिव्हन अजित डोवाल यांना भेटणार
ऑस्ट्रेलियाकडून सॅम कॉन्स्टास २२, उस्मान ख्वाजा ४१, मार्नस लॅबुशेन ६ आणि स्टीव्ह स्मिथ ४ यांचे विकेट गमावले होते. यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि ब्यू वेबस्टर यांनी ४६ धावांची नाबाद भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. भारत दुसऱ्या डावात कर्णधार जसप्रीत बुमराहशिवाय उतरला होता. बुमराहला पाठीच्या दुखारतीमुळे बाहेर झाला होता. त्याच्या जागी विराट कोहली कर्णधार म्हणून नेतृत्त्व करत होता. भारताकडून प्रसिध कृष्णाने तीन तर सिराजला एक विकेट मिळाली.
या सामन्याच्या निकालावर डब्ल्यूटीस फायनलसाठीचा मार्ग ठरणार होता. दक्षिण आफ्रिका डब्ल्यूटीस फायनलसाठी पात्र ठरली होती आणि आता या विजयासह फायनलमध्ये पोहोचणारा ऑस्ट्रेलिया हा दुसरा संघ ठरला आहे. त्यामुळे भारताचा पत्ता कट झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकल २०२३-२५ मध्ये ऑस्ट्रेलियाला अजून दोन कसोटी खेळायच्या आहेत. टीम इंडियाने या सायकलची शेवटची कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये जाण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारताला सिडनी कसोटी कोणत्याही किंमतीत जिंकायची होती. केवळ विजयच टीम इंडियाला पुढे नेऊ शकत होता.