पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून आरोपीची माहिती देणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहेत. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
अत्याचाराच्या घटनेला चार दिवस उलटले असून तीन आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत. पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी सर्व शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. २०० हून अधिक संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. आरोपींच्या शोधासाठी आता पोलिसांकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. आरोपींची माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले आहे. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हे ही वाचा :
मणिपूरमधून शस्त्रे, स्फोटकांचा मोठा साठा जप्त
लँड फॉर जॉब घोटाळा: लालू प्रसाद यादव यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन
उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये रेल्वे रुळावर ‘मातीचा ढीग’
आप खासदार संजीव अरोरा यांच्या घरावर ईडीचा छापा!
गुरुवारी (३ ऑक्टोबर) रात्री २१ वर्षीय तरुणी आपल्या मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेली असता तिच्यावर तिघांकडून अत्याचार करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ५ च्या सुमारास गुन्हा दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पुणे पोलीस आणि पुणे पोलीस शाखेकडून कसून तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची ६० पथके तयार करण्यात आली आहे. १०० हून अधिक ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. या प्रकरणी आरोपींचे स्केच देखील तयार करण्यात आले आहेत. आत आरोपींवर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.