मुंबईच्या रेल्वे स्थाकनांमध्ये बूट पॉलिश करणाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलनाचे अस्त्र उगारले आहेत. रेल्वेच्या नव्या नियमावलीनुसार बूट पॉलिश करणाऱ्यांना रेल्वे स्टेशनच्या आवारात व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी रीतसर टेंडर भरावे लागणार आहे. यामुळे बूट पॉलिश करणारे आक्रमक झाले आहेत.
हातावर पोट असलेल्यांनी टेंडरसाठी पैसे कुठून आणायचे अशी विचारणा या बूट पॉलिश करणाऱ्यांनी केली आहे. संपूर्ण मुंबईत रेल्वे स्थानकांवर बूट पॉलिश करणाऱ्यांची संख्या बाराशेच्या घरात आहे. सर्व बूट पॉलिश करणारे आज CSMT स्थानकामध्ये जमले आहेत, आणि नवीन नियमांबद्दल आंदोलन करत आहेत.
कोणत्याही घोषणा न देता फक्त हातामध्ये निषेधाचे बॅनर घेऊन हे कर्मचारी आंदोलनात उतरले आहेत. त्यांनी या बँनरमध्ये, ७५० पेक्षा जास्त कुटुंबाचे जीवन उध्वस्त होणे थांबवा! अशी मागणी केली आहे. रेल्वेच्या नव्या नियमामुळे देशोधडीला लागण्याची वेळ आल्याचे या कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
मुंबई विद्यापीठाच्या निर्णयावर मंगेशकर कुटुंबीय नाराज
बेरोजगारी, कर्जबाजारीमुळे तीन वर्षात २५ हजार आत्महत्या
अशक्य केले शक्य!…पंतप्रधानांनी केले मुख्यमंत्री योगींचे भरभरून कौतुक
दोन दिवस खडकात अडकलेल्या ट्रेकरला वाचवायला आले लष्करातले देवदूत
नेमकी काय मागणी आहे?
२००६ साली लालू प्रसाद यादवांनी टेंडर न काढण्याचे आदेश दिले होते. तरीही रेल्वेने आता नवीन नियमावली काढली आहे. दोन वर्षाच्या महामारीमुळे मूलभूत गरजही पूर्ण करता आल्या नाही आहेत. मग आम्ही टेंडरसाठी कुठून पैसे भरणार? असा प्रश्न कर्मच्याऱ्यांनी उपस्थित केला आहे. पुढे कर्मचारी म्हणाले की, बूट पॉलिश करून जी कमाई होते त्यावर आमच्या कश्यातरी फक्त मूलभूत गरजा पूर्ण होतात म्हणून आम्ही टेंडर च्या या नवीन निर्णयाचा निषेध करत आहोत.
रेल्वेकडे आता पैसे नाहीत म्हणून आमच्यासाठी टेंडरची नवीन नियमावली काढली आहे. मात्र मोठमोठ्या कंत्राटांना टेंडर का नाहीत? असाही प्रश्न कर्मच्याऱ्यांनी केला आहे.