23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषलसीच्या २ डोस नंतर अजून एक डोस?

लसीच्या २ डोस नंतर अजून एक डोस?

Google News Follow

Related

“भविष्यात कोरोना व्हायरसचे अनेक म्युटेशन समोर येतील, अशा परिस्थितीत भारतीयांना कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससोबतच बूस्टर डोसचीही गरज आहे.” असं वक्तव्य एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी लसीकरणाबाबत केलं आहे. देशात कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट समोर येत आहेत, या पार्श्वभूमीवर आपल्याला बुस्टर डोसची गरज आहे, असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

डॉ. रणदीप गुलेरिया पुढे बोलताना ते म्हणाले की, “असं वाटतंय की, आपल्याला कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज भासणार आहे. कारण वेळेनुसार आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. तसेच भविष्यात विकसित होणाऱ्या कोरोनाच्या नवनव्या व्हेरियंट्सपासून आपलं रक्षण व्हावं म्हणून आपल्याला बूस्टर डोसची गरज आहे.”

एम्सच्या प्रमुखांनी म्हटलं की, सेकेंड जनरेशनची लस इम्युनिटीसाठी उत्तम ठरेल. कारण नवनव्या व्हेरियंटवर ही लस प्रभावी ठरेल. ते म्हणाले की, वॅक्सीनच्या बूस्टर डोसचं ट्रायल सुरु झालं आहे. देशातील लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस देऊन झाल्यानंतर सर्वांना बूस्टर डोस देण्याच्या मोहीमेला सुरुवात करावी लागेल.

हे ही वाचा:

कोल्हापूरावर पुन्हा पुराचं सावट?

पाकिस्तानला ‘वेश्यालय’ म्हणणारे का भेटले नवाज शरीफ यांना?

‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार

पंतप्रधान आवास योजनेतून पूरग्रस्तांना घरे बांधून देणार

भारतात लहान मुलांच्या लसीकरणाला सप्टेंबरपासून सुरुवात होऊ शकते. एआयआयएमएसचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, “कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम महत्त्वाचं पाऊल ठरु शकते. गुलेरिया यांनी सांगितलं की, माझ्या माहितीप्रमाणे जायडल कॅडिलाने ट्रायल केली आहे आणि सध्या ते अपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहेत. भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनची ट्रायलही लहान मुलांवर ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकते. दुसरीकडे फायझरच्या लसीला अमेरिकेच्या नियमांप्रमाणे आपातकालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की, सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्याही लसीकरण मोहीमेला सुरुवात होऊ शकते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा