सोमवार, १० जानेवारीपासून राज्यात बुस्टर डोस दिला जाणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी आणि ६० वर्षे अथवा त्यावरील सह्व्याधिग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीची प्रतिबंधात्मक मात्रा मिळणार आहे. ओमायक्रोनचे वाढते रुग्ण पाहता बुस्टर डोसची मात्रा यावर एक उपाय ठरू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठांना बुस्टर डोस दिला तर सामान्यांनाही बुस्टर डोस देण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. २६ डिसेंबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट जनतेशी संवाद साधत बुस्टर डोस विषयीची घोषणा केली होती.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कोविड- १९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन तसेच स्टँडिंग टेक्निकल सायंटिफिक कमिटी यांच्या निर्देशानुसार हे लसीकरण सुरू होत आहे. सर्व सरकारी, महापालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रावर हा बुस्टर डोस उपलब्ध आहे. खासगी ठिकाणाहून लसीचा डोस घ्यायचा असेल त्यांच्यासाठी आधी जी डोसची किंमत ठरवलेली आहे, त्याच किंमतीत हा बुस्टर डोस मिळेल. ऑनलाइन नोंदणी तसेच थेट जाऊन नोंदणी पद्धतीने ही सुविधा उपलब्ध असेल.
हे ही वाचा:
गुरु गोविंदसिंग यांच्या सुपुत्रांचा बलिदान दिन आता ‘वीर बाल दिवस’
पाकिस्तानातील मुरी येथे बर्फवृष्टीमुळे वाहनांत अडकून पर्यटक मृत्युमुखी
अजबच! ‘भाजपाशी लढण्यासाठी निवडणूक आयोगाने आम्हाला मदत करावी’
धबधब्यात अचानक काळकडा कोसळला; ७ मृत्युमुखी
बुस्टर डोस घेण्यासाठी निकष
- १० एप्रिल २०२१ किंवा त्यापूर्वी लसीचा दुसरा डोस घेतलेला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षे किंवा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक हे १० जानेवारी २०२२ रोजी बुस्टर डोस घेण्यास पात्र असतील.
- दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून ९ महिने किवा ३९ आठवडे पूर्ण हवेत.
- संबंधित लाभार्थींनी आधी कोविशिल्ड लस घेतली असेल तर त्यांना कोविशिल्ड लसीचाच डोस घेता येणार आहे. ज्यांनी आधी कोव्हॅक्सिन लस घेतली असेल त्यांना कोव्हॅक्सिन लसीचा डोस घेता येणार आहे.
- ६० वर्षे अथवा त्यावरील सह्व्याधिग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस साठी कोणतेही प्रमाणपत्र दाखवण्याची आवश्यकता नाही, मात्र अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने बुस्टर डोस घेण्याबाबत निर्णय घ्यावा.