आमदार आशिष शेलार यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विनंती
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेल्या ७२ विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले असून रेल्वेने आणखी गाड्या सोडाव्यात, अशी मागणी भाजपा नेते आमदार एड. आशिष शेलार यांनी पुणे दौऱ्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन केली.
कोकणात गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या कोकणातील गावी जातात.यावर्षी कोकण रेल्वे ने ७२ अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आणि बुकिंग सुरु होताच त्यांचे बुकिंग पूर्ण क्षमतेने होऊन गाड्या भरल्या. त्यामुळे बरेचजण अद्याप प्रतिक्षा यादीतच आहेत.
हे ही वाचा:
विधानसभा अध्यक्ष पदावर जाधवांचा डोळा, पण काँग्रेसने फिरवला बोळा
ईदसाठी भिवंडीतले कत्तलखाने पुन्हा सक्रिय? दोन गायी चोरल्याची घटना
ठाण्यातील रस्ता सात-आठ फूट खचला
पदवी परीक्षांचे निकाल का रखडले?
दरवर्षीच्या तुलनेत या गाड्या कमी असून २०१९ ला कोकण रेल्वेवर २१० फेऱ्या व रेल्वे गाड्यांना ६४७ अतिरिक्त डबेही जोडले होते. तर त्यावेळी तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग साठी ११ टपाल खात्यात, १७ रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम आणि १६ ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा २०१९ ला खास कोकणवासीयांना उपलब्ध करुन दिल्या होत्या.
त्यामुळे याही वर्षी अशा अधिकच्या बुकिंग सुविधा व अजूनच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत, ही विनंती आमदार आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांना केली. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकर आदी उपस्थित होते.