न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या एका परिषदेत विवान कारुळकर याने लिहिलेल्या ‘सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस’हे पुस्तक विविध राष्ट्रांतील प्रतिनिधींना देण्याचे भाग्य लाभले.
या परिषदेच्या पार्श्वभूमीवर विवान कारुळकर सध्या तेथे उपस्थित असून युनायटेड नेशन्समध्ये गेल्या ३८ वर्षांपासून भारताचे सल्लागार आणि वरिष्ठ अधिकारी श्री. गौतम डमरी सिंग यांनी विवानचे अगदी अगत्याने संयुक्त राष्ट्र संघाच्या इमारतीत स्वागत केले.
हेही वाचा :
गुलामीचा नवा चेहरा म्हणजे ‘नाना पटोले’
राम मंदिरात तैनात असलेल्या जवानाचा संशयास्पद गोळी लागून मृत्यू!
पत्नीच्या मृत्यूने बसला धक्का, आसामच्या गृहसचिवानं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या!
जनरल असेंब्ली हॉल आणि सिक्युरिटी कौन्सिल चेंबर या दोन्ही ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या वतीने श्री. गौतम डमरी सिंग यांनी हे पुस्तक स्वीकारले. या दोन महत्त्वाच्या परिसरांना भेट देणे आणि देशाच्या इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत संयुक्त राष्ट्र संघाचा भाग असणे हा मोठा सन्मान होता.