‘सावरकर: विस्मृतीचे पडसाद’ पुस्तकाचे बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते प्रकाशन

‘सावरकर: विस्मृतीचे पडसाद’ पुस्तकाचे बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते प्रकाशन

सावरकर: विस्मृतीचे पडसाद या पुस्तकाचे पुणे येथे प्रकाशन करण्यात आले आहे. महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुरंदरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. विक्रम संपत यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर आणि मंजिरी मराठे यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.

यानिमित्ताने नुकतेच वयाच्या शंभरीत पदार्पण केलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. १९३८ साली पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरे यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत भेट झाली होती. त्यानंतर सावरकरांच्या मृत्यूपर्यंत हा सलोखा कायम राहिला.

हे ही वाचा:

आयपीएलचा पुनःश्च हरी ओम

पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठी सोनीयांची सोनींना पसंती?

आज उघडणार मराठी बिग बॉसच्या घराचे दार

मोदींचा चेहरा आणि शिवसेनेतील फाटके मुखवटे

बाबासाहेब पुरंदरे हे सावरकरांचा हुबेहुब आवाज काढून त्यांची नक्कल करत असत. एकदा तर खुद्द स्वातंत्र्यवीरांना समोर त्यांनी त्यांच्याच भाषणाची नक्कल सादर केली होती. यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बाबासाहेबांना ‘केवळ नकला करीत राहणार का?’ असा सवाल केला होता. तर ‘कलेचा स्वतःसाठी काहीतरी उपयोग कर’ असाही उपदेशही केला होता. सावरकरांचे हेच मार्गदर्शन त्यांना भविष्यात कामी आले.

विक्रम संपत यांचे सावरकरांवरील हे पुस्तक म्हणजे आजच्या काळातील सावरकरांवरील एक परिपूर्ण पुस्तक मानले जाते. सावरकरांवर उपलब्ध इतिहासाचा, कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून त्याची तितकीच रंजक आणि अभ्यासपूर्ण मांडणी या पुस्तकातून करण्यात आली आहे.

Exit mobile version