बॉम्बे वायएमसीएच्या माध्यमातून क्रीडा शिबिरांचे आयोजन

विविध शाखांमध्ये देणार खेळांचे प्रशिक्षण

बॉम्बे वायएमसीएच्या माध्यमातून क्रीडा शिबिरांचे आयोजन

बॉम्बे वायएमसीएच्या वतीने उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी विविध प्रकारच्या क्रीडा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईतील वायएमसीएच्या विविध केंद्रांवर ही शिबिरे घेतली जातील. वायएमसीएच्या वतीने २५ एप्रिलपासून १५० व्या वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे. २५ एप्रिल २०२५पर्यंत हा वर्धापनदिन साजरा होईल. त्याअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

या शिबिरांमध्ये बास्केटबॉल, कबड्डी, टेबल टेनिस, रोलर स्केटिंग, लॉन टेनिस, कराटे, किक बॉक्सिंग, मिक्स मार्शल आर्ट, बॉडी कंडिशनिंग, बुद्धिबळ, बॅडमिंटन, तिरंदाजी, रिदमिक जिम्नॅस्टिक्स, जलतरण आणि वॉल क्लायम्बिंग अशा खेळांचा समावेश आहे.

त्याशिवाय, मुंबईबाहेरही काही शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून त्यातून साहसी क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण आणि अनुभव दिला जाईल.

हे ही वाचा:

ममता सरकारला मोठा झटका, कोलकाता उच्च न्यायालयाने शिक्षक भरती केली रद्द!

मणिपूरमधील ११ बूथवर पुन्हा मतदान!

न्यूझीलंडने तिसऱ्या टी-२० मध्ये पाकिस्तानचा ७ गडी राखून धुव्वा उडवला

चीनधार्जिणे मोइझ्झू यांच्या पक्षाचा विजय

यासंदर्भातील सविस्तर माहिती www.ymcabombay.org या वेबसाईटवर इच्छुकांना माहिती मिळू शकेल. शिवाय 7208928853 या क्रमांकावर संपर्क साधूनही ही माहिती मिळवता येईल, अशी माहिती बॉम्बे वायएमसीएचे सरचिटणीस लिओनार्ड सॅलिन्स यांनी दिली आहे. ही शिबिरे मोफत असतील किंवा अल्प शुल्कात आयोजित केली जातील.

Exit mobile version