शिना बोरा हत्याकांडावर आधारित ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : बरिड ट्रुथ’ ही डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होती.मात्र, त्याआधीच हायकोर्टानं सीरिजचं प्रदर्शन थांबवलं आहे.२३ फेब्रुवारी रोजी ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होती.या सीरिज विरोधात सीबीआयनं कोर्टात धाव घेतल्यानंतर त्याचे प्रदर्शन कोर्टाकडून थांबवण्यात आले आहे.
‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : बरिड ट्रुथ’ या डॉक्युमेंट्रीत शीना बोरा हत्याकांड, त्यानंतर बोराची बहिण आणि तत्कालीन प्रसारमाध्यम कंपनीची प्रमुख राहिलेल्या इंद्राणी मुखर्जी हिची अटक, अशा आदी मुद्दे या सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहेत.मात्र, सीबीआयनं कोर्टात धाव घेत या सीरिजचे प्रदर्शन थांबवले.या प्रकरणाची मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी यांनी या सीरिजमधून आपली प्रतिमा चांगली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप सीबीआयने केला होता.शिना बोरा हत्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.या वेबसिरिजमुळे या प्रकरणाच्या सुनावणीवर चुकीचा प्रभाव पडू शकतो असा दावा, सीबीआयने केला होता.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निवासस्थानी सीबीआयची छापेमारी
ईडीकडून बायजूसचे संस्थापक रवींद्रन यांच्या विरोधात लुकआउट नोटीस
संदेशाखाली प्रकरणी अटक केलेल्या तृणमूल नेत्यावर आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल!
“विरोधकांनी टीका करण्यापेक्षा निर्णय चुकीचा कसा हे दाखवावे”
कोर्टाने देखील याची दखल घेत ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : बरिड ट्रुथ’ या डॉक्युमेंट्रीचे प्रदर्शन थांबवले आहे.२० फेब्रुवारी रोजी या प्रकरणावर सुनावणी झाली.न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजूष देशपांडे यांच्यापुढे झाली ही सुनावणी पार पडली.हायकोर्ट, सीबीआयचे अधिकारी आणि वकिलांसाठी विशेष स्क्रीनिंग करण्याचे नेटफ्लिक्सला निर्देश दिले आहेत.त्यानुसार आता उद्या प्रदर्शित होणा-या ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’चं प्रदर्शन थांबवण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या २९ फेब्रुवारीला मुंबई हायकोर्टात होणार आहे.