मुंबईत झाडांवरील रोषणाईच्या माळा काढण्यास सुरुवात!

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका लागली कामाला

मुंबईत झाडांवरील रोषणाईच्या माळा काढण्यास सुरुवात!

मुंबईत सुशोभीकरणासाठी झाडांवर वापरण्यात आलेल्या लाईटच्या माळा आता महापालिकेने काढण्यास सुरुवात केली आहे.झाडांवरील दिव्यांची सजावट प्रकाश प्रदुषणासाठी कारणीभूत असल्याचे उच्च नायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर नायालयाने राज्यसरकासह महापालिकेला झाडांवरील दिव्यांच्या माळा काढण्याचे आदेश दिले होते.यानंतरमहापालिका कामाला लागली असून मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांनी आप-आपल्या हद्दीतील झाडांच्या खोडावरील दिव्यांची माळ हटवण्यास सुरुवात केली आहे.

झाडांवरील विद्युत रोषणाई प्रकाश प्रदूषणात भर घालणारी असून झाडांवर अधिवास करणारे पक्षी आणि कीटकांवर या दिव्यांचा वाईट परिणाम होत असल्याने पर्यावरण प्रेमींनी या संदर्भात याचिका दाखल केली होती.या याचिकेची गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन सरकार आणि मुंबई महापालिकेला नोटीस बजावली.त्यानंतर मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांनी रोषणाई हटवण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा:

इस्रायलने प्रत्युत्तर दिल्यास.. कधीही न वापरलेलं शस्त्र बाहेर काढू!

दिनेश कार्तिकच्या ८३ धावा ठरल्या अपुऱ्या

‘निवडणूक रोखे मागे घेतल्याने प्रत्येकाला पश्चात्ताप होईल’

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना गुजरातमधून अटक

ठाणे येथे राहणारे येऊर पर्यावरण संस्थेचे संस्थापक रोहित जोशी यांनी वकील रोनिता भट्टाचार्य यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली होती.झाडांवरील दिव्यांची सजावट प्रकाश प्रदूषण आणि पक्ष्यांच्या जीवनावर विपरित परिणाम करत असल्याकडे या याचिकेतून लक्ष वेधले होते. नोव्हेंबर २०२३ पासून, मुंबई-ठाण्यातील अनेक झाडांवर दि्व्यांची सजावट करण्यात येत असल्याचे देखील याचिकेत मांडण्यात आले होते.

यानंतर उच्च न्यायालयाने राज्यसरकारसह मुंबई पालिकेला नोटीस बजावली.न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने विद्युत माळा हटविण्यास सुरुवात केली आहे.गोरेगाव,अंधेरी, जोगेश्वरी परिसरातील रोषणाई हटविण्याचे काम सुरु झाले आहे.दरम्यान, झाडावर केलेल्या रोषणाईमुळे झाडाच्या वाढीवर परिणाम होतो.तसेच अवेळी झाडावरील पानाच्या गळतीची भीती असते.कीटक विचलित होण्याची शक्यता असते.झाडांवरील पक्षांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते.

Exit mobile version