कोविडचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाढायला लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर बार काऊन्सिलने पुन्हा एकदा व्हर्च्युअल हायब्रीड (ऑनलाईन) सुनावणी घ्यायला सुरवात करावी अशी विनंती बॉम्बे बार असोसिएशनने केली आहे.
या बाबतीतील एक पत्र मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधिश दीपांकर दत्त यांना बॉम्बे बार असोसिएशनने पाठवले आहे. यापूर्वी कोरोना कहर वाढलेला असताना न्यायालयाने ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घ्यायला सुरूवात केली होती. न्यायालयाचे कामकाज देखील ऑनलाईन पद्धतीने चालले होते.
हे ही वाचा:
ठाकरेंना भारतरत्न, राऊतांना नोबेल
राजकीय नेतृत्वानेच केली वाझेची नियुक्ती…राऊतांनीच दिली पुष्टी
परमबीर सिंह यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी
कोविडचा उद्रेक कमी झाल्यानंतर हळूहळू एक एक सेवा उघडली गेली. त्याप्रमाणे न्यायालयाने देखील पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात केली होती. आता पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेची खबरदारी म्हणून न्यायालयाने ऑनलाईन सुनावणी घ्यायला सुरावत करावी अशी विनंती बार असोसिएशनकडून करण्यात आली. दिनांक १९ मार्च रोजी बार असोसिएशनची बैठक घेण्यात आली. या वकिलांच्या बैठकीत कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
उच्च न्यायालयात सुमारे पाच लाख केसेस प्रलंबित आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीशांना पुन्हा एकदा सेवेत बोलावण्याबद्दल विचार करायला घेतला होता. आता ऑनलाईन सुनावणीमुळे पुन्हा एकदा न्यायलयाच्या सुनावणीच्या गतीवर काय परिणाम होतो ते पाहणे आवश्यक ठरणार आहे.