आता बॉम्बे नाही, मुंबई आर्ट सोसायटी!

आता बॉम्बे नाही, मुंबई आर्ट सोसायटी!

मुंबईतील बॉम्बे आर्ट सोसायटीचे नामकरण अखेर ‘मुंबई आर्ट सोसायटी’ असे करण्यात आले. सन १८८८ मध्ये बॉम्बे आर्टची स्थापना झाली होती. सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तब्बल १३३ वर्षांनंतर नामकरणाची घोषणा करण्यात आली. सोसायटीच्या नावामध्ये बॉम्बे ऐवजी मुंबई असावे, अशी मागणी गेले कित्येक वर्षे केली जात होती.

प्रदर्शने आयोजित करणे, कलादालने चालवणे या बरोबरच आता कलावंत आणि कलारसिक यांच्यात संवाद कसा घडेल याकडेही विशेष लक्ष दिले जाणार आहे. चर्चा सत्रे, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रात रसिकांशी संवाद घडवण्याचा प्रयत्न कलावंतांच्या प्रादेशिक समन्वय समित्यांमार्फत केला जाणार आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. काही गरजू चित्रकारांनी आर्थिक मदत मागितली होती, अशा कलाकारांना शक्य तेवढी आर्थिक मदत केली असल्याचे सोसायटीचे सचिव चंद्रजित यादव यांनी सभेत सांगितले.

हे ही वाचा:

बापरे!! वर्षभरात अमलीपदार्थांचा डोंगरच उपसला

शाळेत जाणाऱ्या शिक्षकांनाच झाली शिक्षा!

राममंदिराच्या प्रतिकृतीसाठी लागली ‘एवढी’ मोठी बोली

व्हॉट्सऍप बिना जिया जाए ना!

‘मुंबई आर्ट सोसायटी’च्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. राजेंद्र पाटील यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली. मुंबई आर्ट सोसायटीचे वार्षिक प्रदर्शन ही कलारसिकांसाठी पर्वणी असते. यंदा मात्र १२९ व्या प्रदर्शनला कलाकार, कलारसिक हा माहौल करोनाच्या संकटामुळे प्रत्यक्षात अनुभवू शकले नाहीत. तरीही प्रदर्शनाची परंपरा मोडायची नाही यासाठी मुंबई आर्ट सोसायटीच्या माध्यमातून हे प्रदर्शन यंदा ऑनलाईन  भरवले होते.

Exit mobile version